Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परब आता मोठ्या पडद्यावर झळकणार

0
Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परब आता मोठ्या पडद्यावर झळकणार
Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परब आता मोठ्या पडद्यावर झळकणार

नगर : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) फेम शिवाली परब (Shivali Parab)आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. आजवर प्रेक्षकांनी तिला विनोदी भूमिका साकारताना पाहिलंय, मात्र आता ती एका गंभीर विषयावरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री शिवाली परब ‘मंगला’ (Mangala) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार

‘मंगला’ या चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित (Shivali Parab)

शिवालीच्या ‘मंगला’ या चित्रपटातील पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या ‘मंगला’ या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या चरणी या चित्रपटाच्या  पोस्टरचे  अनावरण  करण्यात आले आहे.  या चित्रपटात मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

अवश्य वाचा : विदर्भात पावसाचे थैमान!हवामान विभागाकडून अलर्ट जारी

चित्रपटात नेमकं काय? (Shivali Parab)

सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत.एक कौलारू घर आणि कोपऱ्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे. मंगला नावाच्या एका गायिकेवर सूडाच्या भावनेतून अॅसिड हल्ला झाला होता. कठीण परिस्थितीशी तिने कशी झुंज दिली होती, ते या चित्रपटात पाहायला मिळेल. त्या काळी अॅसिड हल्ल्यासंबंधित कोणताही कायदा नव्हता, त्यामुळे योग्य तो न्याय न मिळाल्याने मंगलाने या परिस्थितीचा सामना कसा केला, हे पाहणं रंजक ठरेल.

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. मंगला या चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here