Mangala Marathi Movie:शिवाली परब अभिनीत ‘मंगला’ चित्रपटाची तारीख आली समोर,ऍसिड हल्ल्यातील गूढ उलगडणार  

0
Mangala Marathi Movie:शिवाली परब अभिनीत 'मंगला' चित्रपटाची तारीख आली समोर,ऍसिड हल्ल्यातील गूढ उलगडणार  
Mangala Marathi Movie:शिवाली परब अभिनीत 'मंगला' चित्रपटाची तारीख आली समोर,ऍसिड हल्ल्यातील गूढ उलगडणार  

नगर : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातुन घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab). छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या शिवालीचा ‘मंगला’ (Mangala Movie) हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. आता या चित्रपटाची तारिख समोर (Date Relesed)आली आहे. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन ‘मंगला’ हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नक्की वाचा :  ‘लाडकी बहीण’ योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार  

पोस्टरमध्ये नेमकं काय ? (Mangala Marathi Movie)

सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास शिवालीमार्फत ‘मंगला’ या चित्रपटातून १० जानेवारी २०२५ ला समोर येईल. नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची तारिख घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून या हल्ल्याची प्रचिती ही येतच आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.

अवश्य वाचा :  मोठी बातमी!नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या

अपर्णा हॉशिंग यांनी केले ‘मंगला’ चित्रपटाचे दिग्दर्शन (Mangala Marathi Movie)

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या  पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here