Shivcharitra : अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जगातील प्रत्येक तरुणाचा आदर्श आहेत. तरुणांनी शिवचरित्रातून (Shivcharitra) स्वातंत्र्य, समता, बंधुता, भक्ती, शौर्य, माणुसकी कुटुंबवत्सल्य, धर्मनिरपेक्षता शिकावी. शिवचरित्र स्वातंत्र्य, समता, बंधुता, भक्ती, शक्तीचा संगम आहे, असे प्रतिपादन प्रा. सीताराम काकडे (Sitaram Kakade) यांनी केले.
अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद
पारंपरिक झेलीम खेळत तरुणांनी पाहुण्यांचे स्वागत केले
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सावानिमित्त आष्टी तालुक्यातील हातोळण (औरंगपूर) आयोजित कार्यक्रमात प्रा. सीताराम काकडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ होते. तर, व्यासपीठावर श्यामराव विठ्ठल बँकेचे व्यवस्थापक स्वप्निल रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष नितीन मिसाळ, उपसरपंच बलभिम काळोखे, ग्रामपंचायत सदस्य संजय काळोखे, संदीप मिसाळ, शरद मिसाळ, विजय वाघ, सचिन खताळ, माजी उपसरपंच उत्तमराव मुटकुळे, प्रभाकर मिसाळ, आप्पा गांगर्डे, एकनाथ मिसाळ, दत्तात्रय वाघ, संभाजी काळोखे, मुख्याध्यापक निलेश जाधव, ग्रामविकास अधिकारी संदीप मिसाळ, संदीप जाधव, अंबादास कोरडे, बबन काळोखे, सामाजिक कार्यकर्ते शहाराम मिसाळ, अनिल वाघ, बापूराव जाधव, समीर सय्यद, मनोहर कुलकर्णी, बाळू सय्यद, उद्योजक मनोहर वाघ, राम यादव, राजू शिंदे, मच्छिंद्र थोरात, दीपक मिसाळ, भानुदास मिसाळ, शिवाजी मिसाळ, सीनापुत्रचे अध्यक्ष देविदास मिसाळ आदींसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती जयंतीनिमित्त पारंपरिक झेलीम खेळत तरुणांनी उत्साहात पाहुण्यांचे स्वागत केले.
नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रा. सीताराम काकडे म्हणाले, (Shivcharitra)
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. स्त्री ही देव्हार्यातील देवता आहे, ही शिकवण छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिली म्हणूनच आजही स्त्रियांचा महाराष्ट्र देशी आदर केला जातो. माँ जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. आजमितीला प्रत्येक आईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे तरुण घडविण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता जय घोष करून जमणार नाही तर, शिवचरित्र डोक्यात घ्यावे लागेल. तरच शिव स्वराज्य निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त केले. प्रास्ताविक मनोहर वाघ यांनी केले.
छावा चित्रपटाचा मोफत शो
शिवजयंती उत्सवानिमित्त हातोळण येथील जगदंबा तरुण मंडळाने गावातील महिला व तरुणांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो दाखविला. त्यामुळे उत्सावाला मोठ्या प्रमाणात महिला व तरुणांची गर्दी होती.