Shivdurg Trekkers : ‘शिवदुर्ग’चा शतक महोत्सव सोहळा उत्साहात साजरा
Shivdurg Trekkers : नगर : ग्रामीण भागातील तरुणांना सोबत घेऊन सह्याद्रीतील १०० गडकोट ट्रेकिंग (Trekking) मोहिम यशस्वी पूर्ण करून मोहिम नियोजनातील अद्वितीय शिवकार्य केल्याबद्दल शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने श्रीगोंदा (Shrigonda) येथे शतक महोत्सव सोहळा साजरा (Celebrate) करण्यात आला.
शिवदुर्ग परिवाराने किल्ले धर्मवीरगड येथे २०१८ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्तंभास मानवंदना देऊन १५ मार्च २०२६ रोजी किल्ले शिवनेरी येथे १०० गडकोटांच्या अभ्यासपुर्ण भटकंती करणारी संस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस, नगरसेवक एम. डी. शिंदे, चांदणी खेतमाळीस, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर, शिक्षक बँक माजी चेअरमन डॉ. संदीप मोटे, उद्योजक गणेश होळकर, राजु उकांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत शिंदे, शिवव्याख्याते लक्ष्मण नाईकवडी, यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, डॉक्टर, वकील, अनेक शिवप्रेमींनी उपस्थित राहुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिवव्याख्याते योगेश मांडे व्याख्यान झाले.
ग्रामीण भागात शिवकार्य उभे करणारी पहिलीच संस्था (Shivdurg Trekkers)
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून २९५१ दिवसांपासून ५४५१ सदस्यांच्या साथीने १२ युनेस्को मानांकित जागतीक वारसा किल्ल्यांची पायधूळ घेतली आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्हे, १०० किल्ले, १०० वेळा गडपुजन, १०० वेळा महाराष्ट्र गीतगायन, गडावरील ७५० गोणी प्लॅस्टिक गोणी संकलन करून स्वतःची नियमावली, आचार संहिता ठरवून ट्रेकिंग विश्वातील मानदंड आणि दीपस्तंभ निर्माण केला आहे. तसेच वारसा जतन, बारव संवर्धन क्षेत्रातही मोठी तरुणाईची टीम निर्माण केली आहे. ग्रामीण भागात असे शिवकार्य उभे करणारी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन ही पहिलीच संस्था ठरली आहे.
राजेश इंगळे,
संस्थापक अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन
या सोहळ्यासाठी अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील शिवदुर्ग परिवाराचे शिलेदार सदस्य उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवदुर्ग संचालक मंडळ, महाराष्ट्र बारव मोहिम, शिवदुर्ग वारसा संवर्धन समितिच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी केले. अध्यक्षस्थान अॅड.गोरख कडूस यांनी भूषविले. सुत्रसंचालन मारूती वागस्कर व प्रा.भरत खोमणे यांनी केले तर आभार दिगंबर भुजबळ यांनी मानले.