Shivdurg Trekkers Foundation : पानीपत विरांचा वारसा संवर्धन व्हावे; शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे तहसीलदारांना निवेदन

Shivdurg Trekkers Foundation

0
Shivdurg Trekkers Foundation
Shivdurg Trekkers Foundation

 
Shivdurg Trekkers Foundation : श्रीगोंदा : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा (Historical Heritage) संवर्धन करणाऱ्या शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या (Shivdurg Trekkers Foundation) वतीने श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

श्रीगोंदा तालुक्यात पानिपत विरांची सर्व वारसास्थळे

इतिहास जतन करण्यासाठी शासन स्तरावर दखल घेऊन श्रीगोंदा शहर व तालुक्यातील अनेक गावांत असणारी वारसास्थळे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशा आशयाचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार यांना देण्यात आले. श्रीगोंदा ही तत्कालीन शिंदे घराण्याची पहिली राजधानी होती. पानिपत वीरांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. या सर्व वारसा स्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आता हा वारसा जपला नाही तर परत कधीच हा इतिहास व वारसा आपण जतन करू शकणार नाहीत. म्हणून तातडीने हा  संपूर्ण वारसा राज्य पुरातन विभागाच्या माध्यमातून संवर्धित होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अवश्य वाचा: दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अशी करण्यात आली मागणी (Shivdurg Trekkers Foundation)

या निवेदनातून श्रीगोंदा शहरातील पानिपत वीरांची शौर्यगाथा सांगणारा राजवाडा राज्य पुरातन विभागाच्या माध्यमातून संवर्धित करणे, पानिपत वीरांची शौर्यगाथा असणारी दिल्ली वेस व पुर्व वेस वारसा स्मारक घोषित होणे, मैनाबाई माळावरील सर्व समाधीस्थळे संवर्धित होणे, सरदार महादजी शिंदे पादुका स्मारक संवर्धन करणे, श्रीगोंदा, म्हातार पिंपरी, भानगाव, बेलवंडी कोठार, देऊळगाव गलांडे, ढोरजा, मांडवगण, येथील पानिपत वीरांची वारसा स्थळे संवर्धित होणे, श्रीगोंदा येथे पनिपत वीरांचे स्मारक बनवणे,  शिंदेशाही घराण्याचे पुरातन वास्तू संग्रहालय निर्माण व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली. यावेळी शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे प्रभारी अध्यक्ष उषा दिगंबर भुजबळ, उपाध्यक्ष सचिन भोसले,  मारूती वागसकर, सागर शिंदे, अ‍ॅड. गोरख कडूस , अमोल बडे, अ‍ॅड. महेश क्षीरसागर, नितीन शेळके उपस्थित होते.