Shivdurg Trekkers Foundation : कलावंतीण सुळक्यावरून पानिपत वीरांसाठी सह्यांची मोहीम; श्रीगोंद्यातील वारसा संवर्धनासाठी शिवदुर्गचा पुढाकार

Shivdurg Trekkers Foundation : कलावंतीण सुळक्यावरून पानिपत वीरांसाठी सह्यांची मोहीम; श्रीगोंद्यातील वारसा संवर्धनासाठी शिवदुर्गचा पुढाकार

0

Shivdurg Trekkers Foundation : नगर : श्रीगोंदा शहरात असणारा पानिपत वीरांचा ऐतिहासिक (Historical) वारसा दररोज ढासळत आहे. हा वारसा पुढील पिढीसाठी टिकला पाहिजे या उदात्त हेतूने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन (Shivdurg Trekkers Foundation) संस्थेच्या सदस्यांनी सह्याद्रीच्या (Sahyadri) ऊंच कलावंतीण दुर्ग शिखरावर ट्रेकिंग करत जाऊन ‘सामान्य नागरिकांची एक सही पानिपत वीरांच्या वारसा संवर्धनासाठी’ या मोहीमेची सुरूवात करण्यात आली.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

पानिपत वीरांचा वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी आहे. या शहराला ऐतिहासिक पानिपत लढाई आणि शिंदेशाही घराण्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. श्रीगोंदा शहरात असणारे राजवाडे, वेस, समाधीस्थळे, बारवा हा वारसा सध्या अत्यंत विदारक अवस्थेत असुन मोडकळीस आलेला आहे. वेळीच हा वारसा संवर्धन केला नाही तर नामशेष होऊ शकतो. पुढील पिढीसाठी पानिपत वीरांचा वारसा व शिंदेशाही इतिहासाचे संवर्धन व्हावे यश हेतूने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Shivdurg Trekkers Foundation : कलावंतीण सुळक्यावरून पानिपत वीरांसाठी सह्यांची मोहीम; श्रीगोंद्यातील वारसा संवर्धनासाठी शिवदुर्गचा पुढाकार
Shivdurg Trekkers Foundation : कलावंतीण सुळक्यावरून पानिपत वीरांसाठी सह्यांची मोहीम; श्रीगोंद्यातील वारसा संवर्धनासाठी शिवदुर्गचा पुढाकार

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

शिवदुर्ग ट्रेकर्सकडून वारसा जतन करण्याचा निर्धार (Shivdurg Trekkers Foundation)

त्यानुसार महाराष्ट्रातील सह्याद्रीतील अत्यंत कठीण व उंच अशा कलावंतीण दुर्ग सुळक्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराची ९५ वी. ट्रेकिंग मोहिम रायगड जिल्ह्यातील ऊंच कलावंतीण दुर्ग व प्रबळगडावर गेली होती. यामध्ये ५२ सदस्य सहभागी झाले होते. यावेळी प्रबळमाची येथे ७५ वी. प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व शिलेदारांनी हा वारसा जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘पैसे नको फक्त एक सही हवी’
श्रीगोंद्यातील पानिपत वीरांचा वारसा आम्हाला पुढील पिढीसाठी आमचं कर्तव्य म्हणून जपायचा आहे. म्हणूनच ही सह्यांची मोहिम श्रीगोंदा तालुक्यात राबवली जाणार आहे. पैसे नकोत फक्तं आपली एक सही हवीय. या सह्यांसोबत पानीपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत.”

  • राजेश इंगळे
    संस्थापक अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन