Shivdurg Trekkers Foundation | शिवदुर्गचा ‘धर्मवीर पालखी सोहळा’ उत्साहात; किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड रथयात्रा संपन्न

0
Shivdurg Trekkers Foundation | शिवदुर्गचा 'धर्मवीर पालखी सोहळा' उत्साहात; किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड रथयात्रा संपन्न
Shivdurg Trekkers Foundation | शिवदुर्गचा 'धर्मवीर पालखी सोहळा' उत्साहात; किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड रथयात्रा संपन्न

Shivdurg Trekkers Foundation : नगर : शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन (Shivdurg Trekkers Foundation) संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील किल्ले धर्मवीरगड पेडगाव येथून किल्ले रायगडवर (Raigad Fort) छत्रपती संभाजी महाराजांची पालखी नेण्यात येते. पालखी सोहळ्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. शिवदुर्गची ही ७९वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम तर एकुण ९९वी गडकोट मोहीम उत्साहात पार पडली.

हेही वाचा : लव्ह मॅरेजसाठी लागणार आई-वडिलांची परवानगी? नवा कायदा नेमका काय ?

श्रीगोंदे आणि रायगडाचा संबंध

श्रीगोंदयाचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे गुरू संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीस्थळापासून हा पालखी सोहळा सुरू होतो. पेडगाव येथील धर्मवीर गडावरील शौर्यस्तंभाचे पूजन करून छत्रपती संभाजी महाराजांची पालखीने किल्ले रायगडकडे प्रस्थान केले. दुसऱ्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी चीत दरवाजात पालखीचे पुजन करुन पायी पालखी सोहळा गडावर गेला. महादरवाजा, शिरकाई मंदिर, होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी, व जिजाऊंच्या समाधी स्थळी पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

सलग ९ वर्षांपासून अभ्यासपूर्ण भटकंती (Shivdurg Trekkers Foundation)

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने सलग ९ वर्षांपासून किल्ले रायगडवर अभ्यासपूर्ण भटकंती व परतीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यामध्ये एकुण ९ गोणी प्लॅस्टिक संकलन करून गडाखाली आणण्यात आले. या पालखी सोहळ्यास श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शुभेच्छा दिल्या.

नक्की पहा : मढीची यात्रा पुन्हा वादात; मुस्लिम व्यावसायिकांना विरोध

मोहीमेदरम्यान श्रीगोंदा आणि किल्ले रायगड यांचा ऋणानुबंध व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक घटनांची संदर्भासह माहिती अध्यक्ष राजेश इंगळे दिली. श्रीगोंदा तालुक्यातील, सातारा, अहिल्यानगर, पुणे जिल्हयातील शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे स्वयंसेवक शिलेदार, महिला रणरागिणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रा. भरत खोमणे, गणेश कुदांडे, अजित दळवी, अमोल बडे, सचिन भोसले, प्रा. प्रणव गलांडे, विठ्ठल ढाणे, संगीता इंगळे, सीमा भोसले, वंदना झराड, भाऊसाहेब आभाळे, जय दळवी, अभिषेक भापकर, रमेश झेंडे यांनी हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.