Shivendra Raje Bhosale : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून कर्डिले कुटुंबीयांचे सांत्वन

Shivendra Raje Bhosale : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून कर्डिले कुटुंबीयांचे सांत्वन

0

Shivendra Raje Bhosale : नगर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी बुऱ्हाणनगर (Burhannagar) येथे आमदार स्व. शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती

कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत केले सांत्वन

भोसले यांनी स्व. कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार

मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, (Shivendra Raje Bhosale)

स्व.शिवाजी कर्डिले हे अत्यंत मनमिळावू व सामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत संघर्षातून सरपंच पदापासून ते इथपर्यंतचा त्यांनी प्रवास केला. त्यांच्या अचानकपणे जाण्याने जिल्ह्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. या दु:खातून कर्डिले कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, असेही ते म्हणाले.