Shivprahar Sanghatana : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी (Pimpalgaon Malvi) येथील कावळी तलाव ते खोसे, आढाव, झिने, लहारे वस्तीत जाणारा पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून तत्काळ खुला करावा, अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या (Shivprahar Sanghatana) वतीने जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी युवक तालुका अध्यक्ष गोरक्षनाथ आढाव, शिवाजी आढाव, विनायक झिने, आदिनाथ झिने, गोरक्षनाथ झिने, दत्तात्रय झिने, सुधाकर झिने, सहदेव खोसे, शरद खोसे, सिंधुबाई खोसे, कैलास लहारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर
पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्या मागणी (Shivprahar Sanghatana)
पिंपळगाव माळवी येथील कावळी तलाव ते लहारे वस्तीत सुमारे २०० ते २५० लोकसंख्या वास्तव्य करते. मात्र, या वस्तीकडे जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही. शेतकरी, दूध व्यवसायिक व शाळकरी मुलांना ये-जा करताना प्रचंड कसरत करावी लागते. रस्त्यालगत मोठी झाडी-झुडपे निर्माण झाली आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पानंद रस्ता बंद केला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे जाणे-अवघड होते, तर अलीकडे बिबट्याच्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पानंद रस्ता तातडीने अतिक्रमण मुक्त करून खुला करावा अशी मागणी त्यांनी केली.