Shivraj Singh Chouhan : जनसामान्‍यांच्‍या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार कटीबध्‍द: चौहान

Shivraj Singh Chouhan : जनसामान्‍यांच्‍या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार कटीबध्‍द: चौहान

0
Shivraj Singh Chouhan : जनसामान्‍यांच्‍या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार कटीबध्‍द: चौहान
Shivraj Singh Chouhan : जनसामान्‍यांच्‍या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार कटीबध्‍द: चौहान

Shivraj Singh Chouhan : राहाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे विकसित भारताचे अभियान हे शेतापासून ते लखपती दिदि यांना प्रोत्‍साहन देवूनच देशामध्‍ये कार्यरत आहे. जनसामान्‍यांच्‍या जीवनातील बदलांसाठी केंद्र सरकार (Central Government) सर्व स्‍तरावर काम करीत असून कृषी आणि ग्रामीण विकासाच्‍या माध्‍यमातून परिवर्तन आणण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी तथा ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केले.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

शेतकऱ्यांशी मंत्री चौहान यांनी साधला संवाद

बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांशी मंत्री चौहान यांनी संवाद साधला. यावेळी झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्‍या योजनाबाबतची माहिती त्‍यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. लाडक्‍या बहिणीला लखपती दिदी करण्‍याबाबत केंद्र सरकार कुठेही कमी पडणार नसल्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

याप्रसंगी उपस्थिती (Shivraj Singh Chouhan)

जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या शेतकरी संवाद कार्यक्रमास माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, कुलगुरु डॉ.विलास खर्चे, जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.आनंद भंडारी, आयसीएआरचे संचालक डॉ.एस.के रॉय, कृषी उपसंचालक रफीक नाईकवाडी, डॉ.भास्‍करराव खर्डे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन दिनकर, सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, नगराध्‍यक्षा जयश्री थोरात, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उत्तम कदम आदी याप्रसंगी उपस्थित होते.


मंत्री चौहान यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्‍या ग्रीन हाऊस, पॉलिहाऊस तसेच हॉर्टीकल्‍चर योजनांचे अनुदान मिळण्‍यास होत असलेला उशिर लक्षात घेवून यासाठी नवी रचना करण्‍याबाबत विचार केला जाईल. नैसर्गिक शेती मधून उत्‍पादीत होणाऱ्या मालाचे प्रमाणीकरण करण्‍यासाठी स्वतंत्र व विश्‍वासार्ह यंत्रणा कार्यान्वित करताना मालाला दुप्‍पट भाव मिळण्‍याबाबतही प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये कृषी विभागाच्‍या सुरु असलेल्‍या कामाचा आढावा घेवून विद्यापीठांनी आता कालबाह्य झालेल्‍या अ‍भ्‍यासक्रमांबाबत विचार करण्‍याची गरज व्यक्‍त केली. एकीकडे तंत्रज्ञान बदलत आहे. मात्र, कृषी अभ्‍यासक्रमात मात्र बदल होत नाही. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने अभ्‍यासक्रम बदलासाठी दहा वर्षांची अट रद्द करावी, अशी विनंती त्यांनी आपल्‍या भाषणात केली. त्‍याची दखल घेवून मंत्री चौहान यांनी याबाबत निश्चितच गांभिर्याने विचार करण्‍याचे आश्‍वासन दिले. केंद्र व राज्‍य सरकारच्‍या अनुदानातून मंजुर झालेल्‍या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारांचे वितरण, प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्‍मान आणि बचत गटांच्‍या स्‍टॉलचे उद्घाटन मंत्री चौहान यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.