Shivrajyabhishek in Nedarlands: नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) हे भारतातील महान योद्धे,आदर्श राजा आणि रणनीतीकार होते. त्यामुळेच फक्त देशात च नव्हे तर संपूर्ण जगात त्यांना त्यांच्या महान कार्यामुळे ओळखले जाते. याचीच प्रचिती नेदरलँड्समध्ये (Nedarlands) पार पडलेल्या कार्यक्रमात आली आहे.

0
Shivrajyabhishek in Nedarlands: नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
Shivrajyabhishek in Nedarlands: नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) हे भारतातील महान योद्धे,आदर्श राजा आणि रणनीतीकार होते. त्यामुळेच फक्त देशात च नव्हे तर संपूर्ण जगात त्यांना त्यांच्या महान कार्यामुळे ओळखले जाते. याचीच प्रचिती नेदरलँड्समध्ये (Nedarlands) पार पडलेल्या कार्यक्रमात आली आहे. सातासमुद्रापार असलेल्या युरोपियन देश म्हणजेच नेदरलँड्सच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार घुमला. निमित्त होते शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे.

नक्की वाचा : नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा;विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द

भगव्या पताका हाती धरून छत्रपतींचा जयघोष (Shivrajyabhishek in Nedarlands)

नेदरलँड्स या राष्ट्रात मराठी बांधवांनी उभारलेल्या ‘अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने’ शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भगव्या पताका हाती धरून छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा युवक हा आपल्या नगरचा आहे. मयुर सब्बन असं त्याचं नाव आहे. तो श्रमिकनगर भागात राहतो. मात्र सध्या जॉबच्या निमित्त तो परदेशामध्ये आहे.

अवश्य वाचा : अखेर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित;शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला

अल्मेरे महाराष्ट्र मंडळाकडून महाराष्ट्रातील परंपरा जपण्याचे काम (Shivrajyabhishek in Nedarlands)

महाराष्ट्रातून नेदरलँड्स देशात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या मराठी बांधवांनी अल्मेरे येथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून नेदरलँड्स मधील मराठी माणसांना एका धाग्यात बांधण्याचे कार्य केले जात आहे. अल्मेरे महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्रातील विविध परंपरा, सांस्कृतिक सण-उत्सव साजरे करून आपली माती आणि नाती जपण्याचं कार्य करीत आहेत. अल्मेरेमध्ये घरापासून दूर असलेल्या महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपण्याचा या अल्मेरे महाराष्ट्र मंडळाचा उद्देश आहे. मकरसंक्रांती, गुढीपाडवा, दिवाळी या सारखे पारंपारिक सण साजरे करण्यासाठी अल्मेरे आणि अल्मेरच्या आजूबाजूच्या भागातील मराठी भाषिक कुटुंबे आणि मराठी संस्कृतीशी असलेली कुटुंबे एकत्र आणण्याचे या मंडळाचे ध्येय आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आपल्यातील लपलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य या मंडळाकडून केले जाते.

अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना नेदरलँड्समध्ये स्थायिक बिपीन पाटील (मुंबई), दिपाली पाटील (बुलढाणा), उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे), हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी केली. नेदरलँड्समधील अल्मेरे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यात जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प. मराठी शाळेत कार्यरत असलेले ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांची कन्या निशा पाटील यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here