Shivshahir DR.Vijay Tanpure : नगर : प्रसिद्ध शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे (Shivshahir DR.Vijay Tanpure) यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात सेल्फ अपॉईंटमेंट (Self Appointment) हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठराविक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते.
नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस
असे कार्यक्रम महाराष्ट्रभर घेण्याचा मानस (Shivshahir DR.Vijay Tanpure)
या कार्यक्रमात २२ मिनिटांचे ध्यानही घेण्यात आले. यावेळी उपस्थित अनेक लोक भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. असे कार्यक्रम महाराष्ट्रभर व पुढे परदेशातही घेण्याचा मानस शिवशाहीर डॉ. तनपुरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याचे एक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा जागरूकतेचा संदेश देण्यात आला.
अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार
प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित (Shivshahir DR.Vijay Tanpure)
यावेळी डॉ. हेमा वैरागर, डॉ. राजेद्र वैरागर, डॉ.सुभाष वैद्य, डॉ. विलास पाटील, आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, राहुरी अर्बनचे अध्यक्ष रामभाऊ काळे, उद्योजक विष्णू गिते, बंडेशकुमार शिंदे, बाळासाहेब तनपुरे, संजय म्हसे महाराज, निलेश शिंदे, अभिजित शेटे, वरूण तनपुरे व अकोले येथील व्याख्याते जयेश पाटील आदी प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. उद्योजक यमनाजी आघाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.