नगर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांच्या घरासमोर गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परांडा (Paranda) तालुक्यातील सोनारी येथील त्यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे. दरम्यान, उद्या १४ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परांड्यात सभा पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही घटना घडली असल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : शिक्षक दरबारात गुरुजींचा गोंधळ; आमदार दराडेंची राेखठाेक भूमिका
धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार (Dhananjay Sawant)
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे परंडा तालुक्यातील सोनारी इथं घर आहे. या घरासमोर मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला. या सुरक्षा रक्षकाने आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोळीबार कोणी केला हे अजून स्पष्ट झाले नसून,पोलीस त्याचा योग्य तपास करतील,अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केलीय. हा गोळीबार कोणी केला? कशातून गोळीबार झाला? हे पोलिस तपासात समोर येईल.अजून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अवश्य वाचा : भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषण
मंत्री तानाजी सावंत आणि शेतकऱ्यांमध्ये बाचावाची (Dhananjay Sawant)
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत आणि काही शेतकऱ्यांमध्ये बाचावाची झाली होती. तानाजी सावंत हे खंडेश्वरी प्रकल्प पूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता, अशी माहिती मिळाली आहे. यावेळी धनंजय सावंत यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी धनंजय सावंत आणि तानाजी सावंत यांच्याकडून धोका असल्याची भीती देखील व्यक्त केली होती. मात्र, अशातच आता धनंजय सावंत यांच्याच निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबारामागे हेच कारण नाही ना ? अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.