Stree 2 Teaser:ओ स्त्री कल आना! श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’चा टिझर आऊट 

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा 'स्त्री' हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यामुळे प्रेक्षक आता 'स्त्री २' (Stree 2) ची प्रतीक्षा करत आहेत.

0
Stree 2 Teaser:ओ स्त्री कल आना! श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'चा टिझर आऊट 
Stree 2 Teaser:ओ स्त्री कल आना! श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'चा टिझर आऊट 

नगर : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा ‘स्त्री’ हा सिनेमा सुपरहिट झाला होता. २०१८ साली आलेल्या हा सिनेमा हिंदी हॉरर सिनेमातील वेगळा प्रयोग होता. या हॉरर सिनेमाला कॉमेडीचा तडका असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक आता ‘स्त्री २’ (Stree 2) ची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच ‘स्त्री२’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

टीझरमध्ये नेमके काय ? (Stree 2 Teaser)

‘स्त्री २’ च्या टीझरमध्ये  श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी यांची झलक सिनेमात दिसत आहे. तर शेवटी ‘स्त्री’चीही झलक दिसते.’स्त्री २’ मधील ‘ती’ परत आली असून संपूर्ण चंदेरी गाव पुन्हा दहशतीखाली असणार आहे. सुरुवातीला ‘स्त्री’चा पुतळा दिसतो. ज्यावर ‘ओ स्त्री रक्षा करना’ असं लिहिलेलं आहे. तर यावेळी श्रद्धा कपूर लांब वेणीत दिसत आहे. पहिल्या पार्टमध्ये श्रद्धा स्त्रीची कापलेली वेणी लावते असा शेवट करण्यात आला होता. आता सीक्वेलमध्ये श्रद्धाच ‘स्त्री’ असणार का हे पाहण्यात मजा येणार आहे. दुसरीकडे राजकुमार राव आणि त्याचे मित्र पुन्हा ‘स्त्री’पासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहेत. तसंच राजकुमार आणि श्रद्धाची गोड लव्हस्टोरीही पाहायला मिळणार आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

अवश्य वाचा : सावधान!कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार बरसणार 

‘स्त्री २’ १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार (Stree 2 Teaser)

‘स्त्री २’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’च्या पहिल्या भागातील VFX हे कमाल होते. आता या भागातही VFX वर जास्त काम करण्यात आलं आहे. २०१८ साली ‘स्त्री’ ने २५ कोटींची कमाई केली होती. तर सिनेमाचं बजेट १४ कोटी होतं. आता ‘स्त्री २’ची कमाई दुप्पट होण्याचा अंदाज आहे. तसंच यामध्ये प्रेक्षकांसाठी खास सरप्राईजही असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here