Shree Kshetra Devgad : श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांची मांदियाळी

Shree Kshetra Devgad : श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांची मांदियाळी

0
Shree Kshetra Devgad : श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांची मांदियाळी
Shree Kshetra Devgad : श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांची मांदियाळी

Shree Kshetra Devgad : नेवासा: गुरुपौर्णिमा (Guru Purnima) उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (Shree Kshetra Devgad) येथे श्री गुरुदेव दत्त (Shri Gurudev Dutt) पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (Bhaskargiriji Maharaj) यांच्या आयोजित कीर्तन सोहळयाला उच्चांकी गर्दी दिसून आली. सुमारे दोन लाख भाविकांनी आज गुरुपौर्णिमा निमित्त श्री भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विविध पदांसाठी भरती

गुरू शिष्य परंपरा व गुरू महिमावर हरिकीर्तन

श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांचे गुरू शिष्य परंपरा व गुरू महिमा यावर हरिकीर्तन झाले. यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भास्करगिरीजी बाबांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन केले.  किर्तनानंतर महाआरती करण्यात आली. महाआरतीच्या प्रसंगी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.मंदिर प्रांगणात विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अवश्य वाचा : बनावट कागदपत्रे तयार करून लाटली शिष्यवृती; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

हजारो भाविकांनी भास्करगिरीजी बाबांचे घेतले दर्शन (Shree Kshetra Devgad)

यावेळी दिनकर महाराज मते, गुरुवर्य बाबांच्या मातोश्री सरुआई पाटील, स्वामींच्या मातोश्री मिराबाई मते, धुत उद्योग समूहाचे रामकिसन धूत, शामराव किवळेकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला लंघे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, संतसेवक बाळू महाराज कानडे, नामदेव महाराज कंधारकर, छत्रपती संभाजीनगर गायक रामजी विधाते, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांनी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचे दर्शन घेतले. देवगडचे मुख्य प्रवेशद्वार, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर याठिकाणी भाविकांची झालेली गर्दी लक्षणीय होती.