Shreyas Talpade:‘चंदू चॅम्पियन’मध्ये मराठमोळ्या श्रेयस तळपदेची वर्णी!

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

0
Shreyas Talpade:‘चंदू चॅम्पियन’मध्ये मराठमोळ्या श्रेयस तळपदेची वर्णी!
Shreyas Talpade:‘चंदू चॅम्पियन’मध्ये मराठमोळ्या श्रेयस तळपदेची वर्णी!

नगर : अभिनेता कार्तिक आर्यनने (Actor Kartik Aryan) अगदी काही वर्षांतच बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या कार्तिक त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. मराठी पार्श्वभूमी असल्याने या चित्रपटामध्ये मराठमोळे कलाकार झळकले आहेत. यामध्ये मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi kavi) या चित्रपटात मुरलीकांत यांच्या आईची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

नक्की वाचा : नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

चंदू चॅम्पियनमध्ये श्रेयस दिसला इन्स्पेक्टर सचिन कांबळेच्या भूमिकेत (Shreyas Talpade)

‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी पॅराऑलम्पिकच्या सुवर्णपदावर आपलं नाव कोरलं होतं. १४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात श्रेयसने इन्स्पेक्टर सचिन कांबळेची भूमिका निभावली आहे. श्रेयसने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
 
श्रेयसने लिहिले आहे की, “नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मला इन्स्पेक्टर सचिन कांबळेची लहानशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्यावेळी  दिग्दर्शक कबीर खान यांनी  मला या चित्रपटाची गोष्ट सांगितली, तेव्हा सुरुवातीला मला खरंच आश्चर्य वाटलं होतं. आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश लोक या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनला ओळखत नाहीत, याची खंत देखील वाटली. मला सचिन कांबळे ही भूमिका दिल्याबद्दल कबीर भाईंचे खूप खूप आभार.”

अवश्य वाचा : ‘नेत्याला पक्षात घेऊन संपवणं ही भाजपची परंपरा’- विजय वडेट्टीवार

‘चंदू चॅम्पियन चित्रपटगृहात प्रदर्शित (Shreyas Talpade)

“माझा या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल छाब्रा यांचे देखील मनापासून आभार. कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं की, तू माझा या भूमिकेसाठी कसा विचार केलास पण, तू योग्य निर्णय घेतलास…त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग. आता शेवटी कार्तिक आर्यनबद्दल सांगायचं झालं, तर तू खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने ‘चंदू’ची ही भूमिका साकारली आहेस. बायोपिकमध्ये काम करणं हे कधीच सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तू संपूर्णपणे झोकून देऊन काम केलंस. हा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट आणि तुझे भविष्यातील सगळे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! ‘चंदू चॅम्पियन’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका” अशी पोस्ट श्रेयस तळपदेने शेअर केली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीसह हिंदी कलाविश्वात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजारपणानंतर आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here