
Shri Guru Tegh Bahadur JI : नगर : ‘हिंद दि चादर’ (Hind Di Chadar) ‘श्री गुरु तेग बहादूर साहिब जी’ (Shri Guru Tegh Bahadur JI) यांच्या ३५० व्या शहिद समागमानिमित्त अहिल्यानगर मधील ‘गुरुद्वारा भाई दया सिंग जी’, गोविंदपूरा येथे रविवारी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी (Free Health Checkup Camp) व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
राज्य व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य
या शिबिराचे अल्पसंख्यांक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र शासन, अहिल्यानगर जिल्हा प्रशासन व अहिल्यानगर महापालिका सहकार्य करत आहे.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन (Shri Guru Tegh Bahadur JI)
समाजसेवेच्या या पवित्र कार्यात सर्वांनी सहभागी होऊन, सर्व नागरिकांना या शिबिराची लाभ घेण्याचे, व आपल्या संपर्कातील सर्वांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सामान्य आरोग्य तपासणी, हृदयविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्र व श्रवण तपासणी, रक्त तपासणी तसेच आयुष्मान भारत नोंदणी करण्यात येणार आहे. तरी गरजूंनी २० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपासून सुरु होणाऱ्या शिबरास उपास्थीत राहून लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त नगरकरांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन आपल्या सामाजिक दायित्व पार पडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


