Shri Guru Tegh Bahadur Sahibji : नगर : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी (Shri Guru Tegh Bahadur Sahibji) यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी (Martyrdom Centenary) वर्षानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये १३ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध शालेय उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (Bhaskar Patil) यांनी दिली आहे.
नक्की वाचा : टी-२० विश्वचषकात मोठा उलटफेर; दुबळ्या झिम्बाब्वेने दिला ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का
तालुकास्तरावर कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित
शिक्षण संचालनालय व अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार तालुकास्तरावर या कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, १३ फेब्रुवारीला अकोले तालुक्यात प्रभातफेरी व समूह गीत गायनाने या उपक्रमांची सुरुवात होईल. १४ फेब्रुवारीला जामखेडमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा, तर १६ फेब्रुवारीला कर्जतमध्ये प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा पार पडेल. कोपरगाव तालुक्यात १७ फेब्रुवारीला बहुपर्यायी स्पर्धात्मक परीक्षा होईल. अहिल्यानगर तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी एकल व समूह गायन स्पर्धा, प्रभातफेरी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : सीसीटीव्हीमध्ये ‘कॉपी’चा महापूर दिसला अन् 19 जणांची सुट्टी…
चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन (Shri Guru Tegh Bahadur Sahibji)
दि.२० फेब्रुवारीला नेवासा तालुक्यात स्लोगन तयार करून प्रभातफेरी काढणे व डॉक्युमेंटरी दाखवणे हे उपक्रम होतील. २१ फेब्रुवारीला पारनेरमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा, तर २३ फेब्रुवारीला पाथर्डीत रांगोळी स्पर्धा व प्रभातफेरीचे आयोजन केले आहे. २४ फेब्रुवारीला राहाता तालुक्यात डॉक्युमेंटरी दाखवणे व वक्तृत्व स्पर्धा होतील, तर २५ फेब्रुवारीला राहुरीत बहुपर्यायी स्पर्धा परीक्षा व प्रभातफेरी काढण्यात येईल. २६ फेब्रुवारी रोजी संगमनेरमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा पार पडतील. २७ फेब्रुवारीला शेवगाव तालुक्यात चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या मोहिमेची सांगता २८ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यांतील उपक्रमांनी होईल. ज्यामध्ये श्रीगोंद्यात एकल व समूह गायन स्पर्धा व प्रभातफेरी, तर श्रीरामपूरमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातील.
हे वाचा : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
या नियोजित कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी व संदर्भासाठी https://gurutejbahadurshahidi.com या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.



