Shri Guru Tegh Bahadur Sahibji : ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज

Shri Guru Tegh Bahadur Sahibji : ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज

0

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Shri Guru Tegh Bahadur Sahibji : नगर : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी (Shri Guru Tegh Bahadur Sahibji) यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर (Hind-di-chadar)’ समागम सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते (Dadasaheb Gite) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक पातळीवरील कार्यक्रम व नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नक्की वाचा : अवैध सावकारीच्या तक्रारी तातडीने निकाली काढा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Shri Guru Tegh Bahadur Sahibji : ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज
Shri Guru Tegh Bahadur Sahibji : ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज

नियोजनाबाबत बैठकीत आढावा

येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्यानगर येथील गोविंदपुरा भागातील गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथे आरोग्य शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनाबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच, राज्यस्तरावर नवी मुंबईतील खारघर (ओवे मैदान) येथे दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महासोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या भाविकांच्या प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

अवश्य वाचा : आश्रमशाळेतून थेट ‘इस्रो’ची वारी

यांची उपस्थिती (Shri Guru Tegh Bahadur Sahibji)

या बैठकीसाठी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती भारती सागरे, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती सपना भोवते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.व्ही. डावरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर वलांडे, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वृषाली आरु, नायब तहसीलदार मयुर बेरड, सहायक महसुल अधिकारी श्री. राजेंद्र लाड उपस्थित होते.

हे देखील वाचा : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल

दोन्ही कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या सूचना

तसेच कार्यक्रमाच्या नियोजनात समन्वयासाठी गुरुद्वाराचे प्रतिनिधी अमरप्रित वाही, रविंदर नारंग व श्री. हरप्रितसिंग नारंग यांची देखील या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय यंत्रणा व शीख समुदाय यांच्या समन्वयाने दोन्ही कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते यांनी यावेळी दिल्या.