Shri Kanifnath Maharaj : आमदार कोणीही होऊ द्या, पण त्याने गुहाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे – तनपुरे

Shri Kanifnath Maharaj : गुहा येथे श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ; कर्डीले, तनपुरे व बेग यांच्या हस्ते महाआरती

0

गुहा येथे श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; कर्डीले, तनपुरे व बेग यांच्या हस्ते महाआरती

Shri Kanifnath Maharaj : राहुरी : राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ महाराज (Shri Kanifnath Maharaj) यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून यात्रोत्सवानिमित्त महाआरती युवा नेते अक्षय कर्डीले (Akshay Kardile), माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते पार पडली.

नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद

गुहा व पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित

महाआरतीनंतर बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुहातील हिंदू बांधवांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका मांडली. “गुहातील आमच्या हिंदू बांधवांचा प्रश्न एक घाव दोन तुकडे करत कायमचा मिटवावा,” केंद्रात राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. पुढील वर्षीचा यात्रेत पोलीस बंदोबस्तात यात्रा उत्सव न होता गुहाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात राहुरी विधानसभेत आमदार कोणीही होऊ द्या त्याने गप्प न बसता गुहाचा प्रश्न मांडत मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली. सरकार हिंदुत्ववादी संघटनांचे असताना हा प्रश्न एक घाव दोन तुकडे पध्दतीने त्वरीत सुटला पाहिजे.

Shri Kanifnath Maharaj : गुहा येथे श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ; कर्डीले, तनपुरे व बेग यांच्या हस्ते महाआरती
Shri Kanifnath Maharaj : गुहा येथे श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ; कर्डीले, तनपुरे व बेग यांच्या हस्ते महाआरती

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

युवा नेते अक्षय कर्डीले म्हणाले की, (Shri Kanifnath Maharaj)

“गुहातील अनधिकृत अतिक्रमणे काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.स्व. शिवाजीराव कर्डिले साहेबांचे स्वप्न असलेले भव्य-दिव्य श्री कानिफनाथ महाराजांचे मंदिर उभारणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गुहाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी सांगितले की, “आम्ही संविधानावर चालणारे लोक आहोत. आम्ही वक्फ बोर्ड मानत नाही. हिंदुत्ववादी सरकारकडून गुहातील प्रश्न निश्चित मार्गी लागतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र सरकारने धर्मांतरण कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

या कार्यक्रमाला गुहा व पंचक्रोशीतील नाथभक्त, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.