Shri Kshetra Madhi : श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी शांततेत 

Shri Kshetra Madhi : श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी शांततेत 

0
Shri Kshetra Madhi

Shri Kshetra Madhi : पाथर्डी : श्री क्षेत्र मढी (Shri Kshetra Madhi) येथे गोपाळ समाजाची मानाची होळी अत्यंत शांततेत पार पडली. अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच निर्धारित वेळेवर मानकरी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त ठेवला होता. गोपाळ समाजाच्या मानाच्या होळीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. चैतन्य कानिफनाथ मंदिर गड बांधण्याला गोपाळ समाजाने बांधकामासाठी खूप मोठी मदत केल्याने गावची सार्वजनिक होळी (Holi) पेटवण्याचा मान त्या समाजाला देऊन स्थानिक ग्रामस्थ होळीच्या दिवशी होळी करत नाहीत.

अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले

सहा मानकरी पोलीस बंदोबस्तात गडावर


यावेळी सहा मानकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर गेले. नाथाच्या समाधीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीने मानकरी यांना गौऱ्या देण्यात आल्या. मानाच्या गोवऱ्या घेत त्या डोक्यावर ठेऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराला प्रदिक्षणा घातली. देवस्थान समितीच्या वतीने गोवऱ्या दिल्यानंतर मानकरी यांना पोलिसांनी सुरक्षा कडे करून निर्धारित स्थळी आणल्याने कोणीही भाविक मध्ये घुसला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.

हेही पहा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन (Shri Kshetra Madhi)


गोपाळ समाज संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष झेंडू पवार यांनी समाज बांधवांना शांततेत बसून होळी पेटवण्यासाठी मानकऱ्यांना व प्रशासनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ पोलीस बंदोबस्तात सहा मानकरी  येऊन होळी पेटविण्यात आली. नामदेव  माळी, माणिक लोणारे, हरिभाऊ गव्हाणे (हंबीराव), रघुनाथा काळापहाड, भागिनाथ नवघरे, ज्ञानदेव  गिऱ्हे , गोपाळ समाजाच्या मानकऱ्यांनी होळी पेटवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here