
Shri Kshetra Madhi : पाथर्डी : भटक्यांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी (Shri Kshetra Madhi) देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ (Board of Trustees) अहिल्यानगरचे धर्मादाय उपआयुक्त (Charity Deputy Commissioner) नवनाथ जगताप यांनी जाहीर केले आहे.
हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?
निवड झालेले विश्वस्त (Shri Kshetra Madhi)
उत्तम शंकर मरकड, माधुरी गणेश मरकड, विठ्ठल राधाकिसन मरकड, दादासाहेब शिवराम मरकड, उषा संतोष मरकड, मदन विष्णू मरकड (सर्व रा.मढी, ता.पाथर्डी) तर गावाबाहेरील मधून कृषिभूषण सुरसिंगराव माधवराव पवार (रा. खडांबे बु. ता.राहुरी), ॲड. तानाजी धोंडीराम धसाळ (रा.तांदुळवाडी, ता.राहुरी), अनिल अशोकराव साठे (रा.कसबा पेठ,पाथर्डी), महादेव बबन कोकाटे (रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर), तानाजी हिरामण शिंदे (निघोज,ता.खेड,जिल्हा पुणे) याप्रमाणे निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव


