Shri Mohata Devi : पाथर्डी : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी (Shri Mohata Devi) गडावर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान घटस्थापना (Ghatasthapana) ते कोजागिरी पौर्णिमा या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri) होत आहे. या काळात सर्व धार्मिक कार्यक्रम व विधि केले जाणार आहेत.
नक्की वाचा: ‘काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये’- संजय राऊत
भाविकांचा प्रवास सुखकर होणार
मोहटादेवीच्या दर्शनासाठी राज्याचा विविध भागातून लाखो देवी भक्त नवरात्र काळात दर्शनासाठी येतात. या भाविक भक्तांच्या सोयी सुविधासाठी मोहटा देवस्थान समितीने प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी कामकाजाला सुरुवात केली आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत मोहटा देवीचे स्वयंभू स्थान स्थापित आहे. या उंच डोंगरावर देवस्थान समितीने भव्यदिव मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिर परिसरात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने परिसर हिरवाईने नटला आहे. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना अडचण येणार नाही यासाठी सुलभ दर्शन बारी, पाणी, शौचालय, पार्किंग, निवारा, महाप्रसाद याची कामे देवस्थान समितीकडून युद्ध पातळीवर सुरू असून देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी! राज्यात दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार
वन विभागाकडून मोहटा देवस्थानला मोठी जागा हस्तांतरित (Shri Mohata Devi)
वन विभागाकडून मोहटा देवस्थानला मंदिर परिसराची मोठी जागा हस्तांतरित झाल्याने मंदिर परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले आहे. मोहटादेवी गडावर सुमारे दोन हजार दुचाकी मोटरसायकल एकाच वेळी पार्किंग करता येणार आहे. त्यामुळे भाविकांना पायी जाण्यासाठीचे मोठे अंतर कमी होऊन कमी श्रमात देवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या मंदिर परिसरातील हनुमान मंदिरापासून पायऱ्यांचे काम, पार्किंगसाठी जागा, रस्ते रुंदीकरण करून रस्ते मोठे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे मोहटादेवी डोंगरावरील रस्त्यांची वाहतूक कोंडी कमी होऊन देवी भक्तांना सुलभ दर्शन घेता येणार आहे. मोहटादेवीला येण्यासाठी सर्व मुख्य रस्ते खड्डेमुक्त असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
रंगरंगोटी, दर्शन बारीतील रेलिंग दुरुस्ती, मंडप उभारणीचे कामे जोरात सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी मोहटादेवी गडावर सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे. शुक्रवारी (ता.११) सकाळी ८ ते १२:३० या वेळेत होमहवन व पूर्णाहुती जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी कावडीचे पाणी व काल्याचे कीर्तन, रविवार १३ ऑक्टोबर रोजी श्री मोहटादेवी यात्रा, पालखी सोहळा, छबिना मिरवणुक, सोमवार १४ ऑक्टोबरला हजेऱ्या व हगामा, बुधवारी १६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेला नवरात्राची सांगता होणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भाविक भक्तांनी देवी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मोहटादेवी देवस्थानकडून करण्यात आले आहे.