Shri Mohiniraj : नेवासा : नेवासा (Nevasa) नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या (Shri Mohiniraj) यात्रेनिमित्त सोमवारी (ता.१७) यात्रेच्या मुख्य दिवशी सायंकाळी उत्सवमूर्ती पालखीचे श्री मोहिनीराजांच्या मुख्य मंदिरात आगमन होताच “बोल मोहिनीराज महाराज की जय”असा जयघोष करत काल्याची दहीहंडी फोडून रेवडयांची उधळण करण्यात आली. यावेळी श्री मोहिनीराजांच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली होती.
उत्सवमूर्तीची टाळ मृदुंगाचा गजरात पालखीतून मिरवणूक
नेवासे येथील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये सलग पाच दिवस उत्सवमूर्तीची स्थापना करून महाप्रसादाच्या पंगती देण्यात आल्या होत्या. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सायंकाळी उत्सवमूर्तीला टाळ मृदुंगाचा गजर करत पालखीतून श्री मोहिनीराजांच्या मुख्य मंदिरात आणण्यात आले. सदरची पालखी मंगल कार्यालयात आल्यानंतर स्थापित झालेल्या उत्सवमूर्तीला पालखीत ठेवण्यात आले. यावेळी बोल मोहिनीराज की जय असा जयघोष करत व गुलाल व पुष्पांची उधळण करत पालखी मुख्य मंदिराकडे निघाली. पालखीच्या अग्रभागी सनई चौघडा वादक, त्यामागे टाळ मृदृंगाचा गजर करत चाललेले हनुमान भजनी मंडळ, सजविण्यात आलेली पालखी असे या पालखी दिंडीचे स्वरूप होते. या पालखीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पूजन केले.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आली काल्याची दहीहंडी (Shri Mohiniraj)
उत्सवमूर्ती पालखीचे सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता मोहिनीराज मंदिर प्रांगणात आगमन झाल्यानंतर परंपरेने चालत आलेल्या मानाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी रेवड्यांची उधळण करून उपस्थित भाविकांना काल्याचे वाटप करण्यात आले. पाकशाळेतून उत्सवमूर्तीची पालखी निघण्यापूर्वी जुन्या न्यायालयाच्या आवारात ठेवलेल्या पालखीची पूजा नेवासे न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.वाय जाधव, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश जी.बी.यादव, एस एस भोसले यांच्या हस्ते करण्यात आली.
दरम्यान विविध उपक्रमाने यात्रोत्सव साजरा व्हावा, यासाठी गेली महिन्यापासून सूक्ष्म नियोजन करणाऱ्या यात्रोत्सव समिती सह स्वयसेवकांच्या योगदानाचे व नियोजनाचे नेवासेकारांनी कौतुक केले.