Shri Ram Navami : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या (Shri Gurumauli Sangit Vidhyalaya) वतीने रविवार (ता. २६) सायंकाळी श्रीरामनवमीच्या (Shri Ram Navami) निमित्ताने नेप्ती येथील कल्याण रोड वरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना संस्थानच्या थोरले श्रीराम मंदिर येथील भव्य प्रांगणात श्रीराम कथेवर आधारित नृत्य, नाटिका ‘आज अयोध्या सजली’ (Aaj Ayodhya Sajali) हा सुंदर व नयनरम्य कलाविष्कार सादर केला गेला.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दीप प्रज्वलन करून नाटिकेची सुरुवात
या कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी या भक्तिमय श्रीराम कथेवर आधारित नृत्य नाटिकेचा आनंद घेतला. सुरुवातीला डॉ. सी.बी. कुलकर्णी व डॉ. गौरी कुलकर्णी व अशोकजी जरीवाला, विलासजी बडवे, वर्षा पंडित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गोंदवलेकर महाराजांचे प्रतिमा पूजन झाले. सुरवातीला ‘श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भव भय’ या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्री रामांना वंदन करून ‘हम कथा सुनाये राम सकल गुणधाम की’ या गाण्याने श्रीरामाच्या नृत्य कथेला मंगलमयी वातावरणात नृत्याविष्काराच्या सादरीकरणाने नृत्य नाटिकेची जोरदार सुरुवात झाली.

उपस्थितांना अयोध्या सजल्याची अनुभूती (Shri Ram Navami)
नृत्य आणि नाट्य यातून ही कथा हळू हळू फुलू लागली. सर्व प्रसंग लयबद्ध नृत्याद्वारे अक्षरशः जिवंत झाले. सर्व उपस्थित भाविक, भक्तगण, प्रेक्षक ताल्लिन होऊन प्रत्येक प्रसंगाचा व नृत्याचा आस्वाद घेत होते. प्रेक्षकांनी उस्फुर्त पणे दिलेल्या प्रभू ‘श्रीरामचंद्रकी जय ‘ अशा घोषणांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून जात होता. सर्व उपस्थित प्रेक्षक भक्तिभावात राममय होऊन गेले होते. श्रीराम अयोध्येत परतले या प्रसंगाने व त्रिवार जयजयकार या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. खऱ्या अर्थाने श्रीराम नवमीच्या दिवशी थोरले श्रीराम मंदिरात पुन्हा एकदा हर्षोल्हासात आज अयोध्या सजल्याची अनुभूती उपस्थितांना मिळत होती.
श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय निर्मित आज अयोध्या सजली ही नृत्य नाटिका विद्यालयाच्या वतीने गोव्यातही अनेक मान्यवरांच्या समोर सादर झाली आहे. या नृत्य नाटिकेचा हा पाचवा प्रयोग नवीन विद्यार्थी कलाकारांच्या संचात यशस्वीरित्या संपन्न झाला. ही राममंदिरात समर्पित केलेली सेवा आज खऱ्या अर्थाने रुजू झाली आहे. असे प्रतिपादन विद्यालयाच्या संचालिका वर्षा चंद्रकांत पंडित यांनी केले.

या कार्यक्रमाचे निवेदन – भक्ती मंगेश पुराणिक यांनी केले. तर प्रसंगांसाठी की बोर्ड वर अंबरीश जहागिरदार यांनी तर तबल्यावर आनंद ऋषी यांनी साथ संगत केली. श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या गायन शाखेचा छोटा विद्यार्थी श्रीयांश घोडके यानेही नृत्यासाठी बोलाची पढंत करून सर्वांची वाहवा मिळवली.
श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय निर्मित ‘आज अयोध्या सजली’ या नृत्यनाटिकेचे नृत्य व नाट्य दिग्दर्शनही विद्यालयाच्या संचालिका नृत्य तपस्वी वर्षा चंद्रकांत पंडित यांनीच केले आहे. शिवाय या कार्यक्रमात नृत्य, गायन सादर करण्याबरोबरच रामकथेतील माता कौसल्या, गुरू विश्वामित्र व रावण अशा तीन महत्वाच्या भूमिकाही त्यांनी लीलया सादर करून सर्वांना अचंभित केले.
विद्यालयाच्या भरतनाट्यम शाखेच्या बेचाळीस विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी – आस्था पिंगळीकर, रिया सरोवरे, दर्शना दंडवते, पूर्वा म्याना, ललिता सकट, कार्तिकी गुंजाळ, आरोही साबळे, मानवी डेरे, नीलाक्षी वामने, ज्ञानेश्वरी झगडे, देविका साळुंखे, दिव्या राणे, ईश्वरी भापकर, वेरोणिका जाधव, तनया येनगुल, सृष्टी गंधे, रेवती घोटणकर, स्नेहा विखे, मुग्धा भालेराव, कावेरी एकलहरे, श्रेया जाधव, दूर्वा गायकवाड, शुभ्रा मस्तोळी, स्वराली बोरुडे, माही मिसाळ, मीरा जऱ्हाड, शौर्या कांबळे, जानवी बोरुले, अन्वी भोईटे, सर्वांगी आंबेकर, वेदिका साठे, रिजूल शिंदे, शांभवी क्षीरसागर, प्रार्थना सुपलकर, जुईली शिंदे, त्रिशा लहारे, मनस्वी कदम, सुमुखी लोखंडे, कादंबरी साळुंके इ. विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
पुणे, नाशिक येथील अनेक मान्यवर उपस्थित
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक तसेच पुणे, नाशिक येथील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या नृत्य सेवेमुळे उत्सवाचा शेवट गोड झाला याचे फलीत श्रीराम राया पंडित दाम्पत्याला आणि त्यांच्या विद्यालयाला खात्रीने देतीलच. असे शुभाशीर्वाद डॉ.सी.बी. कुलकर्णी यांनी याप्रसंगी दिले. त्यांच्या कृपाशीर्वादाने व सर्व विद्यार्थ्यांचे पालकांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य आम्ही पुन्हा यशस्वीपणे उचलू शकलो त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद आमची संगीत सेवा रामाच्या चरणी रुजू झाली अशा शब्दात विद्यालयाचे सहसंचालक श्री चंद्रकांत पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



