Shri Ram Temple : कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रभू श्रीराम मंदिराचा (Shri Ram Temple) प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर शहरात जय श्रीरामाच्या गजराने परिसर दुमदुमला होता. श्रीराम मंदिरात रामभक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी संपूर्ण शहर राममय आणि भगवामय झाले होता.
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन (Shri Ram Temple)
हे देखील वाचा : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे’, जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना
प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. कर्जत शहरात देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. सकाळी प्रत्येक घराच्यासमोर अंगणात सडा, रांगोळी, घराच्या छतावर प्रभू श्रीरामाची छबी असलेला भगवा ध्वज, बाजारपेठेत लांबलचक भगवे झेंडे आणि पताका लावण्यात आले होते. शहरातील अनेक चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर शहरात मोठा जल्लोष होत जय श्रीरामाचा गजर झाला. प्रत्येक मंदिरात विविध ठिकाणी महाआरती झाल्या. श्रीराम मंदिरात पुष्पवृष्टी करून महाआरती झाली. यासह मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.
नक्की वाचा : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
लाडूचा प्रसादाची भाविकांना वाटप (Shri Ram Temple)
भाविकांनी दर्शनासाठी मोठी रीघ लावत दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने बुंदी आणि लाडूचा प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आला. ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात देखील प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. मंदिराच्या समोर भाविकांसाठी श्रीरामभक्त आणि ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्व कारसेवकांचा सन्मान श्रीराम भक्तांच्यावतीने करण्यात आला. तर संध्याकाळी दीपोत्सव साजरा झाला.