Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur : शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या; सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur : शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या; सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

0

Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur : नगर : शनैश्वर देवस्थानचा (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२, रा. बेल्हेकरवाडी, ता. नेवासा) याने बुधवारी (ता. ३०) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे (Nitin Shete) यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

घोटाळ्यांचे आरोप झाल्याने देवस्थान चर्चेत

शिंगणापूर देवस्थानवर विविध घोटाळ्यांचे आरोप झाल्याने देवस्थान चर्चेत आहे. ही चौकशी सुरु असतानाच गत सोमवारी (ता.२८) देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी शेटे यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. त्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तेच शिंदे या कर्मचार्याने आत्महत्या केली आहे.

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

अकस्मात मृत्यूची नोंद (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur)

बुधवारी (ता. ३०) शुभम शिंदे याचे आईवडील हे शेतात कामाला गेले होते. घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत त्याने गळफास घेतला. शेजारील मुलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.