Shrigonda : शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा तालुक्याचा डंका

Shrigonda : शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा तालुक्याचा डंका

0
Shrigonda
Shrigonda : शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा तालुक्याचा डंका

Shrigonda : श्रीगोंदा : नॅशनल मीन्स कम-मेरिट स्कॉलरशिप (एन एम एम एस) तसेच सारथी या सारख्या शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याने डंका वाजविला. एन एम एम एस परीक्षेत (Exam) तालुक्यातील एकूण ५९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक (Scholarship Holders) झाले आहेत. तर सारथी परीक्षेत २९४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवले आहे.

Shrigonda
Shrigonda : शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा तालुक्याचा डंका

हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान

गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान (Shrigonda)

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून अभ्यास सुरू ठेवण्यास प्रोत्साहित करणेसाठी नॅशनल मीन्स कम-मेरिट स्कॉलरशिप (एन एम एम एस) परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील भानेश्वर विद्यालय, भानगाव, इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी, जनता कन्या विद्यालय काष्टी, कौठे माध्यमिक विद्यालय कौठे, श्री कोळाई देवी विद्यालय कोळगाव, महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कोलेज ऑफ सायन्स श्रीगोंदा, न्यू इंग्लिश स्कूल चांडगाव, न्यू इंग्लिश स्कूल देऊळगाव गलांडे, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगाव, रेणुकादेवी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव, शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय घोगरगाव, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी बु., श्री खुळेश्वर विद्यालय निमगाव खलू, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयाच्या ५९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत राज्यात नंबर मिळविले.

Shrigonda
Shrigonda : शालेय स्पर्धा परीक्षेत श्रीगोंदा तालुक्याचा डंका

नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

चार वर्षासाठी सुमारे २८ लाख ३२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती (Shrigonda)

तर सारथी ( मंथन प्रज्ञाशोध परीक्षा) परीक्षेत श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले तसेच मुलींच्या शाळेतील १११ विद्यार्थी, काष्टी येथील जिल्हा परिषदेच्या मुले तसेच मुलींच्या शाळेतील ३४, कोळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४३, देऊळगाव, चांडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येकी ८, आढळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२, मढेवडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १७, बेलवंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३१, घोगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २८, विसापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ विद्यार्थी असे इयत्ता १ ली ते ४ थी मधील २९४ विद्यार्थ्यांनी सारथी ( मंथन प्रज्ञाशोध परीक्षा) परीक्षेत यशस्वी होत शिष्यवृत्ती मिळविली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी सुमारे २८ लाख ३२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here