Shrigonda : ‘वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा’ पुस्तकाचे प्रकाशन

Shrigonda : 'वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा' पुस्तकाचे प्रकाशन

0
Shrigonda
Shrigonda : 'वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा' पुस्तकाचे प्रकाशन

Shrigonda : नगर: ‘वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा’ (Shrigonda) या पुस्तकाच्या रूपाने श्रीगोंद्याचा इतिहास उजेडात आला आहे. श्रीगोंद्यातील सरदार महादजी शिंदे (Mahadaji Shinde) यांचा वाडा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी ही वास्तू पुन्हा उभी राहणार नाही. त्यासाठी हा वाडा आताच वाचवावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास (History) संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

इतिहास तज्ज्ञ व मान्यवरांची उपस्थिती (Shrigonda)

पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पोतदार सभागृहात राजेश इंगळे लिखित ‘वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा’ या ऐतिहासिक संदर्भ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते. प्रमुख मान्यवर म्हणून पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, वीरगळ आणि शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे, पानिपतवीर जानराव वाबळे यांचे वंशज नितीन वाबळे, ‘आयसर’ वैज्ञानिक संस्थेचे शास्त्रज्ञ अशोक रुपनेर, ज्येष्ठ इतिहास लेखक सुरेश शिंदे, बारव अभ्यासक प्रमोद काळे, मनोज सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

श्रीगोंदेतील पुरातन इतिहास उलगडणार (Shrigonda)

श्रीगोंदा येथील प्राथमिक शिक्षक व शिवदुर्गचे संस्थापक राजेश इंगळे ‘किल्ले दाखवणारा माणूस’ म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा संकलित करून या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केला आहे. पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांनी आदिमानवापासून ब्रिटिश कालखंडापर्यंतचा श्रीगोंदेतील पुरातन वारसा उलगडून सांगितला. यावेळी वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे यांचा ‘वीरगळ विरश्री’ म्हणून गौरव करण्यात आला.


 या सोहळ्यास नगर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन डॉ. संदीप मोटे, संदिप होले, गोवर्धन दरेकर, बाळासाहेब काकडे, विजय उंडे, खंडेराव जठार, प्रमोद कुलकर्णी, विठ्ठल ढाणे, अजित दळवी, मिठू लंके, अक्षय गायकवाड, संकेत लगड, विजय गायकवाड, गोरख नलगे, तुषार चौधरी, अमोल बडे, सचिन भोसले, सागर शिंदे, यांसह नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवदुर्गचे शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सोमेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भरत खोमणे व प्रांजल कुलकर्णी तर आभार मारूती वागस्कर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here