नगर : रात्रीची वेळ… चोहोबाजूंनी पसरलेला किर्रर्र अंधार… अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील (Shrigonda) तांदळी दुमाला येथील एक तरुण, गव्हाच्या पिकाला पाणी देऊन थकल्यामुळे शेतातल्या एका ट्रॉलीमध्ये विसावला. पण अचानक त्याच्या पायाजवळ साक्षात बिबट्या (Leopard at the foot) रूपी ‘यमराज’ येऊन बसले. त्याला वाटलं, ट्रॉलीमध्ये मी सुरक्षित आहे. पण त्याला काय माहित होतं, की ज्या मृत्यूपासून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय, तोच मृत्यू त्याच्या उशाशी येऊन बसणार आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय देणारी ही थरारक घटना (A Thrilling Incident) नेमकी कशी घडली? पाहूया…
नक्की वाचा: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर संक्रात? कारण नेमकं काय?
नेमकं काय घडलं ? (Shrigonda Lepord News)

श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एक तरुण रात्रीच्या वेळी शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास बिबट्यापासून बचाव व्हावा, म्हणून तो तरुण शेतातील ट्रॉलीमध्ये झोपायला गेला. पहाटे चारच्या सुमारास तरुणा ला आपल्या पायाजवळ काहीतरी हालचाल जाणवली. पांघरुण बाजूला सारून पाहतो तर काय? समोर साक्षात बिबट्या बसलेला. काळजाचा ठोका चुकला, शरीराचा थरकाप उडाला. पण त्या क्षणी त्या तरुणाने कमालीची ‘समयसूचकता’ दाखवली. पायापाशी बिबट्या असताना त्या तरुणाने शरीराची कोणतीही हालचाल केली नाही. आरडाओरडा न करता, बिबट्याला न डिवचता तो शांत पडून राहिला. काही मिनिटे हा मृत्यूचा खेळ सुरू होता. अखेर, काही वेळ तिथेच विसावल्यानंतर बिबट्या स्वतःहून ट्रॉलीतून खाली उतरला आणि शेतात निघून गेला. बिबट्या नजरेआड होताच त्या तरुणाने सुटकेचा निःश्वास सोडला.
अवश्य वाचा: साखर सम्राटांची मनमानी! शेतकऱ्यांची ५१८ कोटी एफआरपी थकवली
शेतकऱ्याने शेतात राबायचं की, बिबट्याचं सावज बनायचं? (Shrigonda Lepord News)
श्रीगोंदा तालुक्यात ऊस तोडणी झाल्यानंतर बिबट्यांचा वावर कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, आता ऊस नसल्याने लपण्यासाठी जागा उरलेली नाही, त्यामुळे बिबटे आता थेट मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. तांदळी दुमाला येथील या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरले असून, आज नशिबाने साथ दिली म्हणून जीव वाचला… पण वनविभागाची झोप कधी उडणार? शेतकऱ्याने शेतात राबायचं की, बिबट्याचं सावज बनायचं? हा प्रश्न आज संपूर्ण श्रीगोंदा विचारतोय.



