Shrigonda Municipal Council : श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषदेची (Shrigonda Municipal Council) निवडणूक (Elections) वर्षाअखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार तयारी चालवली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शहरात सध्या राजकीय (Political) चर्चा जोरात आहेत. त्यातच, नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यायचे असल्याने इच्छुकांमधील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आज जाहीर झालेल्या प्रभागरचनेनंतर (Ward Structure) इच्छुकांमध्ये खुशी तसेच नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या
११ प्रभागांमधून २२ नगरसेवक
श्रीगोंदा नगरपरिषदेत आगोदर नऊ प्रभाग व एकोणीस नगरसेवक असे समीकरण होते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३१ हजार १३४ होती. ती लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग व नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता ११ प्रभागांमधून २२ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. सदर प्रभागरचनेवर ३१ तारखेपर्यत हरकती घेता येणार आहेत.
अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार
नवीन झालेली प्रभागरचना- (Shrigonda Municipal Council)
प्रभाग क्र. १ एकूण लोकसंख्या २७६८
उत्तर – घोटवी शिव रस्ता ते वडळी रोड पर्यंत,
पूर्व – घोटवी शिव ते वडळी रस्त्याने शनिचौकापर्यंत,
दक्षिण – शनी चौक आणि नायरा पेट्रोल पंप, पश्चिम – नायरा पेट्रोल पंप ते देवीचे मंदिरापासून पुढे दत्तवाडी वरून घोटवी शीवेपर्यंत.
प्रभाग क्र. २ एकूण लोकसंख्या २८८४
उत्तर – वडळी शिव बेलवंडी कोठार रस्त्याने मांडवगण रस्त्यापर्यंत,
पुर्व- मांडवगण रस्त्याने बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर पासून शेळके यांचे घराजवळून इंगळे यांच्या घरपर्यंत जोधपुर मारुती रस्तालगत
दक्षिण- इंगळे यांच्या पासून जोधपुर मारुती रस्तापासून शनि चौकापर्यंत,
पश्चिम – शनि चौकापासून वडळी रस्त्याने वडळी शिवेपर्यंत.
प्रभाग क्र. ३ एकूण लोकसंख्या २६७३
उत्तर- मांडवगण रोडपासून घुगलवडगाव शिव ते आढळगाव रोडपर्यंत शिव रस्त्याने,
पुर्व – आढळगाव शीवेपासून आढळगाव रस्त्याने बाजारतळापर्यंत,
दक्षिण – बाजारतळापासून दत्त मेडिकल पर्यंत तर पश्चिम – दत्त मेडिकल पासून कुरेश नगर (खाटीक गल्लीने) ताडे यांचे घरापासून जय मल्हार मटन दुकानासमोरून बाजारतळ वेशीपासुन झेंडा चौक कासार गल्ली मार्गे बगाडे डॉक्टर यांचे घराजवळून आमले यांचे घरापर्यंत ते रोहिदास चौक मार्गे दिल्ली वेस ते मांडवगन रस्त्याने घुगलवडगाव शिवपर्यंत,
प्रभाग क्र. ४ एकूण लोकसंख्या ३०३२
उत्तर- आंबेडकर चौक ते आढळगाव रोडने आढळगाव शीवेपर्यंत
पुर्व- आढळगाव शीव ते घोडेगाव रोड,
दक्षिण – घोडेगाव रोड ते मिशन बंगल्याचा मागील बाजूने ससाणे नगरमार्गे गावठाणातून जामखेड रस्ता लेंडी नाल्यापर्यंत,
पश्चिम- जामखेड रस्ता लेंडी नाल्यापासून आंबेडकर चौकापर्यंत.
प्रभाग क्र ५ एकूण लोकसंख्या २६१०
उत्तर- बगाडे डॉक्टर यांचे घरापासून आमले यांचे घरापासून जुनी सेंट्रल बँक ते रोकडोबा चौक मार्गे काळकाई चौकापर्यंत,
पुर्व- दत्त मेडिकल पासून कुरेश नगर (खाटीक गल्लीने) ताडे यांचे घरापासून जय मल्हार मटन दुकानासमोरून बाजारतळ वेशीपासुन झेंडा चौक कासार गल्ली मार्गे बगाडे डॉक्टर यांचे घरापर्यंत, दक्षिण- दौंड-जामखेड रस्ता आनदंकर हॉस्पिटल पासून दौंड- जामखेड रस्त्याने दत्त मेडिकल पर्यंत
पश्चिम – काळकाई चौकापासून दौंड जामखेड रस्ता आनदंकर हॉस्पिटल पर्यंत
प्रभाग क्र. ६ एकूण लोकसंख्या २९९१
उत्तर- सुतार गल्ली ते जिल्हा परिषद शाळेसमोरून संत गोरोबा गल्ली (कुंभार गल्ली) मार्गे भापकर हॉस्पिटल पर्यंत,
पुर्व- जुनी सेंट्रल बँक ते रोहिदास चौक मार्गे सुतार गल्लीपर्यंत तसेच
दक्षिण- काळकाई चौकापासून जुनी सेंट्रल बँक पर्यंत,
पश्चिम – भापकर हॉस्पिटल पासून शिंपी गल्ली मार्गे नगरपरिषद इमारतीची मागील बाजूने काळकाई चौकापर्यंत
प्रभाग क्र. ७ एकूण लोकसंख्या ३०८३
उत्तर- शनि चौकापासून इंगळे यांच्या घराजवळून शेळके यांचे घराजवळून बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर पर्यंत.
पुर्व – बोरूडे यांचे शॉपिंग सेंटर ते दिल्ली वेस पर्यंत
दक्षिण- दिल्ली वेस ते जिल्हा परिषद शाळेसमोरून संत गोरोबा गल्ली (कुंभार गल्ली) मार्गे भापकर हॉस्पिटल पासून बायपास रोड सूर्यनारायण मंदिर जवळ
पश्चिम- बायपास रोड सूर्यनारायण मंदिर पासून शिवाजी चौक गार्डन पासून शनि चौकापर्यंत
प्रभाग क्र.८ एकूण लोकसंख्या २९१०
उत्तर- बाबूर्डी शीवेपासून पारगाव शिवेवरून घोटवी शीवेपर्यंत.
पुर्व- पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी बाबूर्डी फाटा ते देवीचे मंदिरापासून पुढे दत्तवाडीवरुन घोटवी शीवेपर्यंत.
दक्षिण-पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी बाबूर्डी फाटा.
पश्चिम-पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी ते बाबूर्डी रोडने बाबूडीं शीवेपर्यंत
प्रभाग क्र. ९ एकूण लोकसंख्या २६९२
उत्तर – पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी ते बाबूर्डी रोड ने बाबुर्डी शीवेपर्यंत
पुर्व- पारगाव रोड दत्तकृपा लेमन कंपनी ते शिवाजी चौक बायपास रोड मार्गे सूर्यनारायण मंदिर पासून उभी पेठेने शिंपी गल्ली मार्गे नगरपरिषद इमारतीची मागील बाजूने काळकाई चौकापर्यंत काळकाई चौकापासून दौंड-जामखेड रस्ता आनदंकर हॉस्पिटल जवळून दौंड जामखेड रोडने महात्मा फुले चौकापर्यंत.
दक्षिण- महात्मा फुले चौकापासून काष्टी रोडने पाण्याचा चारीने स्टेशन रोड.
पश्चिम-स्टेशन रोड शिव ते म्हतार पिंप्री शिवेने बाबूर्डी शीवेपर्यंत,
प्रभाग क्र. १० एकूण लोकसंख्या २७४८
उत्तर – महात्मा फुले चौकापासून काष्टी रोडने पाण्याच्या चारीने स्टेशन रोडपर्यंत
पुर्व- महात्मा फुले चौकापासून पेडगाव रोडने चोराची वाडी शीवेपर्यंत.
दक्षिण- चोराची वाडी शीवेपासून काष्टी रोड लिपणगाव शीवेपर्यंत.
पश्चिम- काष्टी रोड लिपणगाव शीवेपासून स्टेशन रोड शीवेपर्यंत.
प्रभाग क्र. ११ एकूण लोकसंख्या २७०३
उत्तर – घोडेगाव रोड ते मिशन बंगल्याचा मागील बाजूने ससाणे नगरमार्गे – गावठाणातून जामखेड रस्त्याने महात्मा फुले चौक पेडगाव रोड पर्यंत.
पुर्व- भिंगन शिव रस्ता नगरपरिषद हद्दीपासून घोडेगाव रोडपर्यंत.
दक्षिण-चोराची वाडी शीवेपासून भिंगन शिव रस्ता नगरपरिषदहद्दीपर्यंत.
पश्चिम- महात्मा फुले चौकापासून पेडगाव रोडने चोराची वाडी शीवेपर्यंत सीमांकन जाहीर करण्यात आले आहे.