Shrigonda: श्रीगोंदे : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या कांदा खरेदीची (Buy Onions) सुरवात सोमवार (ता.२५) पासून झाली आहे. पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक (Income) झाल्याचे याठिकाणी पाहायला मिळाले. १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे (Atul Lokhande) तसेच संचालक अजित जामदार (Ajit Jamdar) यांनी दिली.
नक्की वाचा : खासगी दूध संस्थांनाही अनुदान द्या; जनसंघर्षची मागणी
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेल्या बंदीमुळे कमी झालेल्या बाजार भावामुळे तसेच अवकाळी पावसाची भीती यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला दर घसरण झाल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. त्यांना चिंतेने ग्रासले असल्याने शेतकऱ्याकडून मिळेल, त्या भावात कांदा विक्रीसाठी आणला जात आहे. मागील दीड दोन वर्षापासून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद असलेला कांदा लिलाव बाजार समितीचे नूतन सभापती अतुल लोखंडे,उपसभापती मनीषा मगर तसेच संचालक मंडळाच्या प्रयत्नाने सुरु करण्यात आला.
अवश्य वाचा : एस.के. क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमी ठरली अजिंक्य
कांदा खरेदीची सोमवार (दि.२५ ) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक होऊन १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होत असल्याची माहिती संचालक अजित जामदार यांनी दिली.