Shrigonda Police Station : श्रीगोंदा : गोवंशीय जनावरांची (Bovine Animals) अवैध कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी (Shrigonda Police Station) मोठी कारवाई केली आहे. श्रीगोंदा शहरातील (Srigonda City) खाटीक गल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोमांस आणि कत्तलीचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नक्की वाचा : शेवगाव येथील हॉटेलवर पोलिसांचा छापा; तीन बांगलादेशी तरुणींची सुटका
तीन आरोपी ताब्यात
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार (ता. ५) मार्च पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ यांना शहरातील खाटीक गल्लीत काही इसम गोवंशीय जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जमा झाले असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन पंचासह खाटीक गल्लीतील संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी पोलिसांना तीन इसम जनावराचे मांस कापताना दिसून आले. पोलिसांनी घेराव घालून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
घातक रोगांचा प्रसार होण्याची शक्यता (Shrigonda Police Station)
आरोपींकडे या मांसाच्या विक्रीचा कोणताही परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नव्हते. तसेच, उघड्यावर अशा प्रकारे कत्तल केल्यामुळे घातक रोगांचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा ठपकाही पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आप्पा बबन तरटे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध कसाई धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



