Shrigonda ST Stand : श्रीगोंदा एसटी आगाराचा गलथान कारभार; १५ डिसेंबरला धरणे आंदोलन

Shrigonda ST Stand : श्रीगोंदा एसटी आगाराचा गलथान कारभार; १५ डिसेंबरला धरणे आंदोलन

0
Shrigonda ST Stand : श्रीगोंदा एसटी आगाराचा गलथान कारभार; १५ डिसेंबरला धरणे आंदोलन
Shrigonda ST Stand : श्रीगोंदा एसटी आगाराचा गलथान कारभार; १५ डिसेंबरला धरणे आंदोलन

Shrigonda ST Stand : श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील एसटी महामंडळाने (Shrigonda ST Stand) गाड्यांच्या फेऱ्या कमी करत काही ठिकाणी गाड्या अचानक रद्द केल्याने महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना (Passengers) बसत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने प्रवाशांच्या वतीने सोमवारी (ता.१५) श्रीगोंदा आगारासमोर धरणे आंदोलन (Dharne Movement) करण्यात येणार असल्याचे निवेदन श्रीगोंदा आगारातील अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

न सांगता अचानक गाडी रद्द

श्रीगोंदा आगारातील बहुतांश बस जुन्या असल्याने बऱ्याच वेळा बस फेल होतात. त्यातच आगाराने श्रीगोंदा-शिरूर, श्रीगोंदा-नगर यासह अनेक ठिकाणी गाड्यांच्या काही फेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवाशांना बस शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसून फेर्‍या कमी केल्यामुळे व श्रीगोंदा आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे दोन ते तीन तासापर्यंत कुठलीही बस येत नाही किंवा न सांगता अचानक गाडी रद्द केली जात आहे. तर काही ठिकाणी एका पाठीमागे एक तीन ते चार बस धावताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने श्रीगोंदा आगाराच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे.

अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे

निवेदनाद्वारे करण्यात आल्या मागण्या (Shrigonda ST Stand)

महामंडळाने लक्ष देऊन गाड्या वेळेवर सोडाव्या, यासह अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष संतोष जठार, संदीप हिरडे, प्रमिला दीक्षित, ऋतुजा परदेशी, स्वाती देशमुख, संतोष भोसले, अनिकेत घोडके, शितल खेडकर, भारती काळे, शुभम दळवी, केशव कातोरे, शुभांगी हिरवे, महेश सूर्यवंशी, ऋतुजा ओहोळ, दत्ता शेलार उपस्थित होते.