Shrikant Shinde : ‘त्यांनी’ हिंदुत्त्वाचे विचार बाजूला ठेवून दिले; श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

Shrikant Shinde

0
Shrikant Shinde

Shrikant Shinde : नगर : मागील दहा वर्षांत देशात जेवढी कामे झाली, तेवढी कामे यापूर्वी झाली नाहीत. आपण कोणत्या विचारांनी व धोरणांनी काम करतो हे महत्त्वाचे असते. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांनी काम करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात हिंदुत्व विचारांना खुर्चीसाठी बाजूला ठेवण्यात आले. विचारांनुसार कृती करायला बंदी होती. मंदिरे बंद करण्यात आली. हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवून दिले. अविचारी लोकांनी स्टॅलिन, उमर अब्दुल्ला, राहुल गांधी व्यासपीठावर बरोबर बसविले. हिंदुत्व विरोधी लोकांच्या बरोबर आघाडी करण्यात आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यावर सर्वसामान्यांची कामे होऊ लागली. १७ ते १८ तास काम करणारे ते राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली.

नक्की वाचा: विखेंना विरोध करणाऱ्या भुतारेंची मनसेतून हकालपट्टी

अहिल्यानगर नामांतराबद्दल सन्मान (Shrikant Shinde)

शिवसेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा आज नगर शहरातील माऊली सभागृहात झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाबुशेठ टायरवाले आदी उपस्थित होते. अहिल्यानगर नामांतर केल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांचा सन्मान धनगर समाजातर्फे करण्यात आला.

हे देखील वाचा: पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट

श्रीकांत शिंदे म्हणाले (Shrikant Shinde)

ही व्यक्तीची नव्हे तर विचारांची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून भारताला पुढे न्यायचे आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावातच जय आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने विजयी करण्यासाठी कामाला लागा. ही निवडणूक चांगल्या फरकाने जिंकलो तर पुढील निवडणुकाही मोठ्या फरकाने जिंकू, असे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

दादा भुसे म्हणाले, अनेक वर्षांची नामांतराची मागणी पूर्ण झाली आहे. भाजपपेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात जास्त दिसतील. अनेक चांगल्या योजना राज्य सरकारने दिल्या आहेत. जगाच्या पाठीवर भारताचे नाव कानाकोपऱ्यात नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

आम्ही रिल काढण्यात नव्हे तर कामे करण्यात पुढे

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेने या मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेना व विखे पाटील कुटुंबाचे नाते जुने आहे. शिवसेनेने विखे कुटुंबाला दिलेली ताकद आम्ही कधीही विसरलेलो नाही. अनिल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील निवडणुकीत चांगली मदत केली होती. नगर हा जिल्हा राजकीय संवेदनशील जिल्हा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षांपासून नामांतराची प्रलंबित मागणी पूर्ण केली. ३५ वर्षांत पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्ह्याला तीन एमआयडीसी मंजूर झाल्या. ही निवडणूक दोन व्यक्तींची नव्हे तर विचारांची, विकासाची निवडणूक आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना जिल्ह्यात एकही सकारात्मक काम झाले नाही. आमच्या कुटुंबाने काही तरी काम केल्यामुळेच ५० वर्षांपासून जिल्ह्याने आमच्या कुटुंबाला स्वीकारलेले आहे. आम्ही रिल कमी काढू, सोशल मीडियात कमी असू पण कामे करण्यात पुढे आहोत. जिल्ह्यात केंद्राकडून सहा हजार कोटीचे रस्ते मागील पाच वर्षांत झाले. दोन आमदार फुटायला खुप प्रयत्न करावे लागतात. दोन वर्षांपूर्वी ४० आमदार फुटले. याचा अर्थ काही तरी असेलच. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे भाजप बरोबर आले, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here