Shripad Chhindam : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

Shripad Chhindam : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

0
Shripad Chhindam : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
Shripad Chhindam : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

Shripad Chhindam : नगर : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत (Budget General Meeting) घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित घटनेनंतर आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी तातडीने अंगरक्षक देण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

धमक्या देत कागदपत्रांची नासधूस

शुक्रवारी (ता. २७) झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी छिंदम यांना बोलू न देता घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेने धाव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या टेबलवरील माईक तोडून महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. काही नगरसेवकांनी धमक्या देत कागदपत्रांची नासधूस केली आणि त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडल्याचा आरोप छिंदम यांनी केला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यापुढे महानगरपालिकेच्या सभांना उपस्थित राहणार (Shripad Chhindam)

या घटनेत आमदार संग्राम जगताप, विकी जगताप, संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अमोल येवले, मयूर बांगरे तसेच इतर काही नगरसेवकांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही घटना पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे माझ्या जीवाला धोका असून भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर पूर्ण जबाबदारी राहील,” असे छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यापुढे महानगरपालिकेच्या सभांना संरक्षणासह उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.