Shrirampur : जिल्हा मागणीसाठी रविवारी श्रीरामपूर बंदची हाक

Shrirampur : जिल्हा मागणीसाठी रविवारी श्रीरामपूर बंदची हाक

0
Shrirampur : जिल्हा मागणीसाठी रविवारी श्रीरामपूर बंदची हाक
Shrirampur : जिल्हा मागणीसाठी रविवारी श्रीरामपूर बंदची हाक

Shrirampur : श्रीरामपूर: स्वाभिमानी श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी (District Magistrate) कार्यालयावर निदर्शने (Demonstrations) करण्यात आले.

नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदीक म्हणाल्या,

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंद आदिकांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्ह्यासाठी जे जे आंदोलन होतील, त्यामध्ये मी ताकदींनिशी उपस्थित राहील, असेही त्या म्हणाल्या. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा करावा, ही गेली 40 वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे. परंतु राजकीय आकसापोटी  श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडथळा निर्माण केला जात आहे. म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रविवारी (ता.14) श्रीरामपूर स्वयंस्फूर्तीन कडकडीत बंद प्रत्येक श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहान त्रिभुवन यांनी केले.

अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले (Shrirampur)

श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गटतट विसरून श्रीरामपूरकर म्हणून एकजूट आपल्याला दाखवावी लागेल. कामगार नेते नागेश सावंत म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी आपल्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपली ताकद वापरून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आमदार लहू कानडे यांना सांगून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करायला सांगेन. शिवसेनेचे सचिन बडदे म्हणाले, आपल्याला आंदोलनाबरोबर सरकारी दप्तरही कागदोपत्री भांडावे लागेल. प्रशांत लोखंडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांची वेळ घेऊन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणेल. श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे संजय कासलीवाल म्हणाले, आपण जर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी एकजूट दाखवली नाही तर श्रीरामपूर भकास होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन अध्यक्ष मुकेश कोठारी, राहुल मुथा, प्रवीण गुलाटी, अशोक उपाध्ये, उमेश पवार, गौतम उपाध्ये, संतोष बत्रा, योगेश ओझा, अभिजीत लिपटे, बाळासाहेब चांडोळे, शरद शेरकर, निलेश बोरावके, रियाज पठाण, सतीश कुदळे, डॉ. संजय नवथर, अमोल साबणे, नितीन कापसे, अनिल तलोज, संदीप चोरगे, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर, अनिरुद्ध भिंगारवाला, शुभम लोळगे, आबासाहेब अवताडे, प्रवीण फरगडे, मच्छिंद्र साळुंखे, वामन लचके, अनिल चांडवले, हरेश भटेजा, संदीप धिवर, नितीन जाधव, अल्ताफ शेख, रमेश अमोलिक व सर्वपक्षीय नेते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here