Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर प्रभाग रचनेत अनेकांना धक्का; पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची होणार दमछाक

Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर प्रभाग रचनेत अनेकांना धक्का; पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची होणार दमछाक

0

Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेची (Shrirampur Municipal Council) प्रभाग रचना मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप (Machhindra Gholap) यांनी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रभागांच्या नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे तर काहींचा नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यातच कस लागणार आहे.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

नवीन प्रभाग रचनेनुसार आता ३४ नगरसेवक

नवीन प्रभाग रचनेनुसार आता ३४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. पूर्वी ही संख्या ३१ इतकी होती. या नवीन प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडूण दिले जाणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागाची बेस लोकसंख्या ५२५२ अशी गृहीत धरली गेली आहे. प्रभाग रचनेत रेल्वे लाईन व पाटपाण्याचे कालवे ही नैसर्गिक सीमा धरली गेली आहे. त्यामुळे काही इच्छुक नगरसेवकांना सुटसुटीत मतदारसंघ मिळाला असून, काहींना नव्याने प्रभाग शोधावा लागणार आहे.

अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

इच्छुकांकडून हरकतीची शक्यता (Shrirampur Municipal Council)

जुन्या माजी नगरसेवकांना विशेष अडचण नसली, तरी नव्या इच्छुकांकडून हरकती नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघते, त्यावर पुढील सर्वच राजकीय पक्षांची गणिते ठरणार आहेत. प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्रभागात उमेदवार देताना अडचणी येणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.