Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती

Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती

0
Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती
Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती

Shrirampur Municipal Council : श्रीरामपूर : नगरपालिकेने (Shrirampur Municipal Council) काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील ७२२ गाळे धारकांना ७५ टक्के भाडेवाढ (Rent Increase) करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हापासून गाळे धारकांमध्ये प्रचंड रोष होता. मध्यंतरी कोरोनाच्या साथीनंतर (Corona virus) श्रीरामपूर शहरातील गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी झाली. त्यानंतर आता व्यावसायिक हळूहळू आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात ही भाडेवाढ झाल्याने गाळेधारकांमध्ये अस्वस्थता होती.

नक्की वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेत मांडली व्यथा

या गाळेधारकांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांना भेटून भाडेवाढ करू नये म्हणून विनंती केली होती. म्हणून संजय फंड यांनी काही गाळाधारक यांचे शिष्टमंडळ घेऊन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली व आपली व्यथा मांडली.

अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

सध्या भाडेवाढ करू नये अशा सूचना (Shrirampur Municipal Council)

विखे पाटील यांनी गाळेधारकांची व्यथा ऐकून घेत राज्याचे जलसंपदा, कृष्णा व गोदावरी खोरे मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून नामदार विखे पाटील यांच्यामार्फत श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना सध्या भाडेवाढ करू नये अशा सूचना दिल्या. तसेच ही भाडेवाढ स्थगितीबाबत शासन स्थरावर प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून शासनाचे आदेश होईपर्यंत कुठलेही भाडेवाढ करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. याकामी माजी नगराध्यक्ष संजय फंड, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, सोमनाथ गांगड, संजय गांगड, सागर भागवत, अमोल शेटे व सर्व गाळेधारक उपस्थित होते.