
Shrirampur News : श्रीरामपूर : शहरातील कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करुन तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमदार हेमंत ओगले (Hemant Ogale) आणि नगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांनी मुंबई गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची भेट घेऊन केली आहे.
नक्की वाचा : निसर्गाशी मैत्री करा आणि आनंदी रहा: पद्मश्री राहीबाई पोपेरे
जातीय सलोखा बिघडावण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून काही प्रवृत्ती श्रीरामपूर वेगळ्या वळणावर नेऊ पाहत आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त होणे आवश्यक आहे. जाणीवपूर्वक काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडावण्याच्या हेतूने प्रयत्न करत आहे. हे सगळं तातडीने रोखणे गरजेचे असून पोलीस प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश देणे गरजेचे असल्याचे ओगले आणि ससाणे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
श्रीरामपूरची जनता सुज्ञ (Shrirampur News)
हा सगळा प्रकार वेळीच रोखला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल काहींचा उद्देश फक्त आणि फक्त जाती – धर्मामध्ये द्वेष पसरवून अशांतता निर्माण करणे हाच आहे. मात्र श्रीरामपूरची जनता सुज्ञ आहे. आशा कुठल्याही प्रकाराला बळी पडणार नसल्याचे देखील आमदार ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी म्हटले आहे. याबाबत आपण लवकरच राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची देखील भेट घेणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.


