नगर : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आज २५ जून रोजी अॅक्सियम मिशन ४ (Axiom Mission 4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना (Leaving for the space station) झालेत. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकाकडे जाणार आहेत. शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून हे मिशन लाँच करण्यात आले आहे. सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूल मध्ये उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान २६ जून रोजी दुपारी ४. ३० वाजता सुमारे २८.५ तासांनंतर आयएसएसशी जोडले जाणार आहे.
नक्की वाचा : गुगल,फेसबूकसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील १६ अब्ज पासवर्ड्स लीक;केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार (Shubhanshu Shukla)
अमेरिकची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार,भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.
अवश्य वाचा : सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही- शरद पवार
मोहिमेचे उद्दिष्टे काय ? (Shubhanshu Shukla)
अॅक्स-४ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट अंतराळात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे हे आहे. हे अभियान खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देणे देखील आहे. भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक बांधण्याची योजना असलेल्या अॅक्सियम स्पेस प्लॅनिंगचा देखील हा एक भाग आहे.
शुभांशू शुक्ला नेमके कोण आहेत? (Shubhanshu Shukla)
शुभांशू शुक्ला यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून शिक्षण घेतले. ते २००६ मध्ये हवाई दलात सामील झाले. लढाऊ विमाने उडवण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांची निवड इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीही झाली आहे, जी भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. अंतराळवीर होण्यासाठी त्याने रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण घेतले. यामध्ये ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, आपत्कालीन हाताळणी आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये काम करायला शिकले.
शुभांशू शुक्ला अंतराळात नेमकं काय करणार ? (Shubhanshu Shukla)
शुभांशू शुक्ला १४ दिवस तिथे राहतील आणि ७ प्रयोग करतील, जे भारतीय शैक्षणिक संस्थांनी तयार केले आहेत. यापैकी बहुतेक जैविक अभ्यास असतील, जसे की अंतराळातील मानवी आरोग्यावर आणि जीवांवर होणारा परिणाम पाहणे. याशिवाय, ते नासासोबत आणखी ५ प्रयोग करणार आहेत. ज्यामुळे दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी माहिती गोळा केली जाईल. या मोहिमेत केलेले प्रयोग भारताच्या गगनयान मोहिमेला बळकटी देतील.