Shubhanshu Shukla: भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (International Space Station) राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आपल्या चार सहकाऱ्यांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले (Safely on Earth)आहेत. त्यांचे “ड्रॅगन” अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर यशस्वीरीत्या उतरले आहे. तब्बल १८ दिवस अंतराळात राहिल्यानंतर त्यांनी अनेक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले आहे.
नक्की वाचा : रायगड किल्ल्याची पायरी वाट बंद, प्रशासनाचा मोठा निर्णय
अंतराळवीर शुभांशू शुक्ला २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते. ते काल ( ता. १४) अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत दुपारी ४. ४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले होते. अखेरीस, हे सर्व अंतराळवीर आज १५ जुलै रोजी पृथ्वीवर पोहोचलेत.
अंतराळयान समुद्रात उतरल्यामुळे सर्व अंतराळवीरांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि अंतराळ प्रवासामुळे शरीरावर झालेल्या परिणामांपासून त्यांना सावरण्यासाठी पुढील १० दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुभांशू शुक्ला भारतात परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!आमदार,खासदारांसाठी म्हाडाचे घर अवघ्या साडेनऊ लाखात!
शुभांशू शुक्ला यांची अॅक्सिओम-४ या मोहिमेसाठी झाली निवड (Shubhanshu Shukla)
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची अॅक्सिओम-४ या मोहिमेसाठी निवड झाली होती. ४१ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून भारताचे राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवास केला होता. यानंतर शुभांशू यांचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरणार आहे.
शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू (Shubhanshu Shukla)
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच यावेळी शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांना आनंद अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं आहे.