
Shubhra Tamboli : नगर : अहिल्यानगरची ऐतिहासिक राजधानी मानल्या जाणाऱ्या माळीवाडा प्रभाग 12 च्या राजकारणात यंदा मोठी क्रांती पाहायला मिळत आहे. विकासाचा नवा संकल्प आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) (NCP (Ajit Pawar)) युतीने माळीवाड्यात चक्क तीन महिलांना उमेदवारी देऊन निवडणुकीचे (Election) पूर्ण चित्रच बदलून टाकले आहे. यामध्ये शुभ्रा तांबोळी (Shubhra Tamboli), आरती रासकर आणि रुपाली जंजाळे या तीन रणरागिणी आता विकासाचा झेंडा घेऊन मैदानात उतरल्या आहेत.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शुभ्रा तांबोळींसारख्या तरुण व सुशिक्षित चेहऱ्याला संधी
आजवर माळीवाडा प्रभागाचा इतिहास पाहिला, तर या ठिकाणी नेहमीच पुरुष उमेदवारांचा बोलबाला असायचा. ‘एक महिला आणि तीन पुरुष’ किंवा ‘चारही पुरुष उमेदवार’ असे समीकरण आजवर पाहायला मिळाले. मात्र, यंदा भाजपने ‘लाडकी बहीण’ हा केवळ शब्द न ठेवता, त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ठरवले आहे. मातब्बर आणि अनुभवी पुरुष उमेदवारांसमोर शुभ्रा तांबोळींसारख्या तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्याला संधी देऊन भाजपने विरोधकांना बुचकळ्यात पाडले आहे.
अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
जुन्या जाणत्या राजकारण्यांसमोर मोठे आव्हान (Shubhra Tamboli)
प्रभाग 12 मधील निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चा ही शुभ्रा तांबोळी यांची होत आहे. कोणत्याही मोठ्या राजकीय वारशापेक्षा आपल्या कामाच्या जोरावर त्या पुढे येत आहेत. ‘माळीवाड्याचा सर्वांगीण विकास आणि पुनर्निर्माण’ हा एकमेव संकल्प घेऊन त्या मतदारांच्या भेटीला जात आहेत. तरुण रक्त, प्रशासकीय कामाची ओढ आणि महिलांच्या प्रश्नांची जाण यामुळे त्यांच्या उमेदवारीने जुन्या जाणत्या राजकारण्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
भाजपकडून ‘लाडकी बहीण’ ही केवळ घोषणा न राहता, राजकीय शस्त्र म्हणून वापरली जात असल्याचे चित्र आहे. महिला मतदारांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य, तसेच स्थानिक विकासात महिलांचा सक्रिय सहभाग या मुद्द्यांवर भाजप आपली भूमिका ठामपणे मांडत आहे. त्यामुळेच या प्रभागात महिलांच्या उमेदवारीचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रभागात अनेक वर्षांपासून राजकारण करणाऱ्या मातब्बर नेत्यांना आता या ‘लाडक्या बहिणीं’चा सामना करावा लागणार आहे. एका बाजूला प्रदीर्घ अनुभव असणारे दिग्गज आहेत, तर दुसऱ्या बाजूला माळीवाड्याच्या पुनर्निर्माणाचा ध्यास घेतलेली तरुण पिढी आहे. प्रभागातील रस्ते, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि महिलांची सुरक्षितता हे प्रश्न घेऊन या तिन्ही महिला उमेदवार आक्रमक झाल्या आहेत.
दरम्यान, अनुभवी उमेदवारांसमोर उभे राहणारे हे तरुण नेतृत्व मतदारांना कितपत भावते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मात्र, या उमेदवारीवरून माळीवाडा प्रभागात बदलाचे वारे वाहू लागले आहेत, हे मात्र नक्की.


