Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल

Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल

0
Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल
Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल

Shubman Gill : अहिल्यानगर : आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. यामध्ये कसोटीच्या कर्णधारपदी (Test Captain) यावा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) निवड करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

नेतृत्व शुभमन गिलकडे सोपविण्याची करणे

भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपविण्याची करणे आता समोर येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारण म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुबमन गिलकडे भारतीय टी –२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव कर्णधार असताना उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली गेली होती. इतकेच नव्हे तर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी गिलकडे सोपवली गेली होती.

Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल
Shubman Gill : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

अनेक नवख्या खेळाडूंना संधी (Shubman Gill)

या संघांमध्ये अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीमसाठी एक वाईट बातमी म्हणजे स्टार गोलंदाज मोहम्मद शमी संघाच्या बाहेर आहे. तर टीम इंडियामध्ये तब्बल आठ वर्षांनी करून नायरने कमबॅक केलं आहे. त्याच्यामुळे या दौऱ्यात त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.