नगर : भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी (India vs England 4th Test Match) सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubhman Gill) शतकीय खेळी आहे. त्याने २२९ चेंडूंमध्ये १२ चौकार मारत शतक पूर्ण केले आहे. या कसोटी मालिकेतील शुभमन गिलचे हे चौथे शतक आहे. शुभमन गिलच्या शतकासह भारताचा डाव २०० पार गेला आहे. गिलच्या खेळीमुळे भारताचा डाव सावरल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा : “दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण”? – सुप्रिया सुळे
शुभमनची पदार्पणाच्या कसोटी मालिकेत चार शतके (Shubman Gill)
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.तो पहिलाच असा कर्णधार ठरला आहे, ज्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तब्बल चार शतके ठोकली आहेत. आतापर्यंत डेब्यू टेस्ट सिरीजमध्ये तीन-तीन शतकांची कामगिरी फक्त काही महान खेळाडूंनी केली होती. सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव स्मिथ. मात्र गिलने त्यांचा विक्रम मोडत इतिहास रचला आहे.
हेही पहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणाची तयारी अंतिम टप्प्यात
शुभमन गिलने मोडले अनेक रेकॉर्ड (Shubman Gill)
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीतही शतक झळकावले आहे. यासोबत शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाचे महान सर डॉन ब्रॅडमन तसेच भारताचे सुनील गावसकर यांच्याशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम या दोघांच्याही नावावर होता. मात्र,दोघांनीही घरच्या मैदानावर हा पराक्रम केला तर शुभमन गिलने परदेशात पदार्पणाच्या कसोटी हा पराक्रम केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलने शतक झळकावले. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो १०३ धावा काढून बाद झाला. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले.
शुभमन गिलने बर्मिंगहॅम कसोटीत देखील अनेक विक्रम मोडले. पहिल्या डावात त्याने २६९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून १६१ धावा आल्या. लॉर्ड्स कसोटीत गिलची बॅट शांत राहिली. आता त्याने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शतक झळकावले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १८ शतके ठोकली आहे. शुभमन गिलने कसोटीत ९, वनडेमध्ये ८ आणि टी-२० मध्ये १ शतक केले आहे. मागील ३५ वर्षात मँचेस्टरमध्ये शतक ठोकणारा शुभमन गिल हा पहिला भारतीय खेळाडू आहे.