नगर : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) च्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. कारण गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाच्या कर्णधारपदाची (Captain) धुरा गिलकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतल्यानंतर आता संघाची धुरा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सांभाळणार आहे.
नक्की वाचा : टी-२० च्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालची यशस्वी वाटचाल
गुजरात टायटन्सने आज यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात टायटन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नव्या कर्णधाराची घोषणा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देत “कॅप्टन गिल”, असं म्हटलं आहे. त्यामुळे गतविजेत्या गुजरात टायटन्सला नवा कर्णधार मिळाला आहे आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक मानला जात आहे. नुकताच हा ट्रेड पूर्ण झाला आहे. आयपीएल २०२४ च्या सीझनमध्ये शुभमन गिल पहिल्यांदाच सीनियर क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची भूमिका बजावताना दिसणार आहे.
हेही वाचा : ‘कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1’ चा फर्स्ट लूक रिलीज
कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलची प्रतिक्रिया समोर आली आहे, “गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो आणि एवढ्या चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार. आम्ही दोन हंगामात दमदार कामगिरी केली आहे आणि मी या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” असं त्याने म्हटलं आहे.