नगर : भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र भारतीय संघाने गाजवलं आहे. यामध्ये कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) २६९ धावा करत द्विशतक (Double Century) झळकावले आहे. तर रवींद्र जडेजाने ८९ धावा केल्या. यांसह गिलने भारतीय संघाला पहिल्या डावात ५८७ धावांपर्यंत पोहोचवले आहे. शुबमन गिलने भारतीय संघाकडून सर्वात मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे. पहिल्या दिवशी भारतानं २११ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या संघानं ५८७ धावांपर्यंत मजल मारली.
नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत
शुभमन गिलचे मोठे विक्रम (Shubman Gill)
बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील दुसरी कसोटी सुरु आहे. या सामन्यातच शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. शुबमन गिल हा परदेशात म्हणजेच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांविरुद्ध एका डावात सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याच मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनिच्या मैदानावर २४१ धावांची खेळी केली होती. याआधी राहुल द्रविडने अॅडीलेडच्या मैदानावर २३३ धावांची खेळी केली होती. तर सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावर २२१ धावांची खेळी केली होती. गिलने या डावातील २४२वी धाव घेताच या सर्व दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला. तसेच भारतासाठी कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील तो ठरला आहे.
अवश्य वाचा : आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा
शुबमन गिलने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड (Shubman Gill)
आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने २०१९ मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २५४ धावांची खेळी केली होती. मात्र २५५ धावांचा पल्ला गाठताच शुबमन गिलने विराटचा हा मोठा रेकॉर्ड ही मोडून काढला आहे. आता गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे.