Siddharam Salimath : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे : सिद्धाराम सालीमठ 

Siddharam Salimath : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे : सिद्धाराम सालीमठ 

0
Siddharam Salimath : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे : सिद्धाराम सालीमठ 
Siddharam Salimath : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे : सिद्धाराम सालीमठ 

Siddharam Salimath : नगर : दहावी आणि बारावीच्या (12th Exam) विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी विद्यार्थ्यांना (Student) दिल्या. 

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता, अभ्यास या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी

‘आनंददायी परीक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई – वडील,  शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी. आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या आधारे परीक्षेला सोपे करून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेला सामारे जातांना दीर्घ श्वास घेवून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत उत्तरलेखनाला सुरूवात करावी. निकालानंतर आपले गुण आपलेच असल्याचा स्वाभिमान बाळगतांना महत्त्वाकांक्षी स्वप्नांची पूर्तता करावी, असे सालीमठ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टिकोनासाठी समुपदेशन (Siddharam Salimath)

कॉपीमुक्त परीक्षा शपथ, विद्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शिक्षकांमार्फत समुपदेशन,जनजागृती सप्ताह, शिक्षासुचीचे वाचन, परीक्षेत गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव जागृती, परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी, शाळास्तरावर जनजागृती फेरी काढणे, राज्य मंडळाने तयार केलेली चित्रफीत दाखवणे, ग्रामसभा बैठकीमध्ये ग्रामस्थांना कॉपीमुक्तीबाबत आवाहन करणे आदी उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here