Siddharam Salimath : नगर : जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा (12th Exam) शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही (CCTV) बसविण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररुमचीही स्थापना करण्यात आली आहे. शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिला आहे.
नक्की वाचा : माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभात ‘महाजाम’,वाहतुकीवर निर्बंध
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या होणाऱ्या परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येत आहे. ड्रोनकॅमेरा, सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेबकास्टिंगचे संनियंत्रण दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : अतिक्रमण न काढल्याने मनपाची कारवाई – यशवंत डांगे
परीक्षा केंद्रातील वेबकास्टिंगचे संनियंत्रण (Siddharam Salimath)
परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्यात येणार आहे.