Siddharam Salimath : १०० दिवसांत १ लाख दाखले वाटपाचे उद्दिष्ट : सिद्धाराम सालीमठ

0
Siddharam Salimath : १०० दिवसांत १ लाख दाखले वाटपाचे उद्दिष्ट : सिद्धाराम सालीमठ
Siddharam Salimath : १०० दिवसांत १ लाख दाखले वाटपाचे उद्दिष्ट : सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : नगर : जिल्ह्याचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येत आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्यांच्या माहितीबरोबरच भूसंपादन विषयक माहिती अपलोड करण्यात आली आहे. नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी १ लाख दाखले वाटप, ३०० शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे, दरखास्त ताबा प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. जनतेच्या तक्रारी निवारणाचे काम अत्यंत गतीने करण्यात येत असून सेवा हमी कायदा पोर्टलवर सर्वाधिक अधिकारांची नोंद जिल्ह्याने केली आहे, असे १०० दिवसांचा कृती आराखड्याबाबत माहिती जिल्हाधिकारी सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिली. 

अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद

जिल्ह्यातील योजनांचा घेतला आढावा

जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदींसह अधिकारी उपस्थित होते.  ई-हक्क प्रणाली, ई-ऑफीस, ई-चावडी, ई-फेरफार, ई-रेकॉर्ड,, एआय चाटबोट, ई-क्यूजे कोर्ट, ॲग्रीस्टॅक आदी उपक्रमही राबविण्यात येत आहे. उद्योगस्नेही जिल्‍ह्यासाठी परवानगी सुलभता, उद्योजकांच्या अडचणी तसेच निर्यात वृद्धींगत कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

अभिनव उपक्रम (Siddharam Salimath)

नागरिकांना ई कॉमर्सच्या धर्तीवर विविध प्रमाणपत्रे घरपोहोच मिळावीत यासाठी सेवादूत, टंचाई काळात पाणीव्यवस्थापनासाठी जलदूत, पुनर्वसनासाठी संपादित जमीन ओळख आणि त्यांचे डिजिटायझेशन, सामाजिक अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांचे यांचे हयात प्रमाणपत्र ऑनलाइन प्राप्त करण्यासाठी जीवन प्रमाणम आदी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत.